चारचौघांमध्ये वावरत असताना जेव्हा तुम्हाला तुमच्या देशातील किंवा जगातालील काही हटके प्रश्नांची उत्तर ठाऊक असतात किंवा तुमचं सामान्यज्ञान चांगलं असतं तेव्हा अर्थात स्वत:ला गर्व वाटतो. Know some facts in the world and increase your general knowledge
अर्थात तुम्हाला तुमच्या सामान्य ज्ञानात General knowledge वाढ करायची असेल तर वर्तमानपत्र वाचणं, पुस्तक वाचणं आणि बातम्या पाहणं गरजेचं आहे.
याशिवाय सोशल मीडियाचा Social Media जर तुम्ही योग्य वापर केलात तर सध्याच्या युगात माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया हे देखील एक प्रभावी माध्यम आहे.
आज आम्ही तुम्हाला असेच काही जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.
हिरव्या मिरचीमुळे कोणता आजार दूर होतो?
:हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे फ्रि रॅडिकल्सपासून शरीराचं संरक्षण होत आणि कॅन्सरचा धोका दूर होतो.
कोणत्या देशामध्ये लाल रंगातं केळ आढळत?
ऑस्टेलियामध्ये लाल रंगाचं केळं आढळतं. हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या केळीच्या तुलनेत लाल रंगाच्या केळ्यांमध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण जास्त असतं. यामुळे हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.
हे देखिल वाचा-
बैल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
बैल हा स्पेन या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या देशामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जातात.
अंतराळामध्ये पहिल्यांदा माकडाला केव्हा पाठवण्यात आलं होतं?
1949 सालामध्ये अमेरिकेने अल्बर्ट नावाच्या माकडला यशस्वीरित्या अंतराळात पाठवलं होतं. मात्र अंतराळातून परतत असताना पॅराशूटमध्ये समस्या निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
भारतातील सर्वात महागडं हॉटेल कोणत्या शहरात आहे?
भारतातील सर्वात महागडं हॉटेल हे मुंबई किंवा दिल्लीत नव्हे तर जयपूरमध्ये आहे. रामबाग पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे.
ट्राफिक सिग्नलची सुरुवात सर्वप्रथम कशासाठी करण्यात आली होती?
सर्वप्रथम ट्राफिक सिग्नल प्रणालीचा वापर हा रेल्वेसाठी करण्यात आला होता.
कोणत्या देशातील लोक सध्या चहासोबत समोसा खाणं पसतं करत आहेत?
ब्रिटनमधील लोक सध्या चहासोबत बिस्किटांएवजी समोसा खाणं पसंत करत आहेत. यावर्षी झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये ब्रिटनमधील तरुण चहासोबत समोसा खाणं पसंत करत असल्याचं समोर आलंय.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.