रोज सायकल चालवल्याने पोटाची चरबी होईल गायब, Cycling चे आरोग्यासाठी हे आहेत फायदे

रोज सायकल चालवल्याने तुम्ही अगदी फिट राहू शकता. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहता. सायकल चालवणं हे शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.
सायकलिंगचे फायदे
सायकलिंगचे फायदेEsakal
Updated on

वजन कमी करण्यासाठी किंवा खास करून पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये घाम गाळतात. तसंच वेटलॉस Weight Loss किंवा फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. Know the benefits of daily Cycling for to keep yourself fit

तर काहींना वजन कमी करण्यासाठी Weight Loss तसचं फिट राहण्यासाठी नेमकी कोणती एक्सरसाइज Exercise करावी असा प्रश्न पडतो. तर यासाठी सायकलिंग हा एक उत्तम पर्याय आहे. वजन कमी करण्यासोबतच फिट राहण्यासाठी आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सायकलिंग Cycling हा एक चांगली एक्सरसाइज आहे.

खरं तर फिट राहण्यासाठी हा सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. रोज सायकल चालवल्याने तुम्ही अगदी फिट राहू शकता. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहता. सायकल चालवणं हे शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तसचं पोटाची चरबी कमी करायची असेल. सोबतच फिटनेस मिळवायचा असेल तर तुम्ही दररोज काही वेळ तुमच्या क्षमतेनुसार सायकलिंग करा. तुम्ही काही महत्वाच्या कामासांठी देखीस सायकलचा वापर करू शकता. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर केल्यास तुमचं कामही होईल आणि एक्सरसाइजही होईल.

हे देखिल वाचा-

सायकलिंगचे फायदे
Weight Loss Tips : व्यायाम अन् डायटशिवाय बारीक होण्याचा जगातभारी फॉर्म्युला; पांढऱ्या रंगाला दूर ठेवा!

१. वजन होईल कमी- वजन कमी करण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला पर्याय आहे. नियमितपणे सायकल चालवल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार जास्त स्पीडने म्हणजेत फास्ट सायकल चालवल्याने फॅट्स वितळण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

तसचं सायकलिंगमुळे मेटाबॉलिज्म Metabolism जलद होत असल्याचं काही अभ्यासातून समोरं आलं आहे. यामुळे कॅलरी बर्न होण्यासही मदत होते.

२. पाय मजबूत होतात- आपल्या संपूर्ण शरिराचा भार हा आपल्या पायांवर असतो. त्यामुळे पाय मजबूत असणं गरजेचं आहे. सायकलिंग हा एक उत्तम लोअर बॉडी वर्कआऊट आहे. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

जर तुमच्या पायांना पूर्वी एखादी दुखापत झाली असेल तर तज्ञांच्या देखऱेखीखाली तुम्ही हळू हळू स्लो सायकलिंग करू शकता. यामुळे देखील पाय मजबूत होण्यास मदत होईल.

३. कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात- सायकल चालवल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसचं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

एका अभ्यासानुसार इनडोर सायकलिंग केल्याने कोलेस्ट्रॉलवर सकारात्मक परिणाम होतो. सायकलिंगमुळे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसचं चांगलं कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

४. मेंदूची ताकद वाढते- सायकलिंगमुळे तणाव दूर होण्यासोबतच चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते. तसेच सायकलिंग करताना रस्त्यावर लक्ष केंद्रित होत असल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.

एका स्टडीनुसार वयोवृद्ध लोकांनी सायकलिंग केल्याने त्यांची मेंटल हेल्द सुधारण्यास मदत होते. नियमित १० मिनिटं सायकल चालवल्याने दिवसभरासाठी उर्जा राहते.

५. आजार होतील दूर- दररोज सायकल चालवल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. सायकलिंगमुळे स्ट्रोक, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच टाइप २ डायबिटीज नियंत्रणात राहतो आणि शुगरही नियंत्रणात राहते.

यामुळेच सायकलिंग हा एक्सरसाईज फिटनेससह आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.