Used Bikes: सेकंड हॅण्ड बाईक आणि कार खरेदी करताय? Mobile वरुनच होईल ओनरशीप ट्रान्सफर

सेकंड हॅण्ड कार किंवा बाईक खरेदी केल्यानंतर सर्व कागदपत्र आणि ओनरशीप ट्रान्सफर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. शिवाय ही प्रक्रिया अनेकदा वेळ खावू ठरू शकते. मात्र आता तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाईन देखील करू शकता
Second Hand bike ownership tips: how to transfer used car ownership online
Second Hand bike ownership tips: how to transfer used car ownership onlineEsakal
Updated on

अनेकजण नवी कार किंवा बाईक घेण्यासाठी पुरेसं बजेट नसल्यास सेकेंडहॅण्ड वाहन खरेदी Vehicle Purchase करण्याचा पर्याय निवडतात. कमी किमतीमध्ये यामुळे कार किंवा बाईक घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होतं. Know this before purchasing second hand car or bike and ownership transfer

केवळ साध्याच नव्हे तर अनेकजण सेकेंड हॅण्ड किंवा वापरलेल्या लक्झरी कार Luxury Car किंवा हायएण्ड बाईक देखील खरेदी करतात.

जुनी कार किंवा बाईक खरेदी Bike Purchase करणं खिशाला परवडणारं असलं तरी त्यानंतर ती गाडी आपल्या नावावर ट्रान्सफर करणं हे मोठं अवघड काम असतं. यासाठी परिवहन कार्यालयाच्या Regional Transport Office कार्यालयाच्या अनेक फेराव्या माराव्या लागणार या विचाराने अनेकजणांची चिंता वाढते. शिवाय या कामासाठी RTO एजंट काही रक्कम फी म्हणून वसूल करतात.

सेकंड हॅण्ड कार किंवा बाईक खरेदी केल्यानंतर सर्व कागदपत्र आणि ओनरशीप ट्रान्सफर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. शिवाय ही प्रक्रिया अनेकदा वेळ खावू ठरू शकते. मात्र आता तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाईन देखील करू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.

परिवहन मंडळाच्या https://parivahan.gov.in/parivahan/ या पोर्टलवर जाऊन तुम्ही ट्रान्सफरची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

१. पोर्टलवर गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागेल.

२. त्यानंतर तुमची गाडी कोणत्या RTO अतंर्गत येते ते नमूद करावं लागेल.

३. त्यानंतर व्हेइकल रिलेटेड सर्विसेस या पर्यायामध्ये तुम्हाला ट्रान्सफर ऑफ ओनरशीप Transfer Of Ownership हा ऑप्शन निवडायचा आहे.

हे देखिल वाचा-

Second Hand bike ownership tips: how to transfer used car ownership online
Used Car Loan : सेकंड हँड कारसाठी लोन घेताय? 'या' गोष्टींची खबरदारी घ्या, होईल मोठा फायदा

४. तुमच्या समोर फॉर्म २९ आणि फॉर्म ३० दिसतील. या दोन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती योग्यरित्या भरायची आहे.

५. त्यानंतर तुमच्यासमोर ट्रान्सफर फी भरण्याचा पर्याय येईल. प्रत्येक राज्यासाठी ही फि वेगवेगळी आहे. साधारण ५००-१००० रुपये ही फि असते.

६. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही UPI किंवा नेटबँकिंगच्या मदतीने ही फि भरू शकता.

७. तुम्हाला फी भरलेल्याची रिसिट मिळेल. ही रिसिट आणि दोन्ही फॉर्मची प्रिंट तुम्हाला संबंधित आरटीओ कार्यालयात द्यायची आहे किंवा तुम्ही मेल करू शकता.

किती दिवसात मिळेल नवं RC

RTOला तुमचे सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. यासाठी साधारण ७-१० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर ७ वर्किंग डे मध्ये आरटीओ कार्यालय तुमच्या पत्त्यावर तुमच्या नावावर ट्रान्सफर झालेलं नवं आरसी पाठवून देतं .

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन प्रक्रिया केल्यास तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये सतत चकारा माराव्या लागणार नाहीत आणि तुमचा वेळ वाचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.