कार खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र कार खरेदी करायची म्हंटलं तर तुमचं बजेट Budget चांगलं हवं. गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या किमतींमध्ये Car Prices मोठी वाढ झाली आहे. कार खरेदी करायची म्हंटलं तर कमीत कमी ५ लाख रुपये तर खर्च करण्याची तुमची तयारी हवी. Know this formula to repay your car loan
अर्थात अनेकजण कार खरेदी करण्यासाठी कार लोनचा Car Loan पर्याय निवडतात. कार लोनमुळे तुमचं कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्य होतं. काही साधारण अटींची पूर्तता केल्यास अनेक बँका Banks कार लोन सहज देतात.
कार लोनवर कार खरेदी करणं सोप असलं तरी कालांतराने कार लोन फेडता फेडता अनेकांची दमछाक होते. शिवाय दीर्घकाळासाठी घेतलेल्या कार लोनमुळे अनेकदा तुमचा मोठा तोटा होवू शकतो आणि याचा परिणाम तुमच्या आर्थिक बजेटवर होत असतो.
कार लोन घेत असताना कर्जाचा व्याज दर, ईएमआय EMI आणि कर्जाचा कालावधी या तीन प्रमुख गोष्टीं आहेत. जर तुम्ही कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक असा फॉर्मुला सांगणार आहोत. ज्यामुळे कार लोनमुळे तुमच्यावर कालांतराने दबाव निर्माण होणार नाही आणि तुमचं आर्थिक नुकसान देखील होणार नाही. या फॉर्मुला म्हणजे 20:10: 4.
काय आहे 20:10: 4 फॉर्मुला
अलिकडे वाहन खरेदी करत असताना अनेक बँका कारच्या किमतीच्या ९० टक्क्यांपर्यातं लोन पुरवतात. मात्र 20:10: 4 फॉर्मुलानुसार कार खरेदी करत असताना कारच्या ऑनरोड किमतीच्या २० टक्के डाऊनपेमेंट करणं योग्य ठरतं. म्हणजेच जर तुम्ही १० लाखांची कार खरेदी करत असाल तर २ लाख रुपये डाऊनपेमेंट करा आणि ८ लाखांचं कर्ज घ्या.
हे देखिल वाचा-
असं ठरवा EMIचं गणित
तसंच तुमच्या कार लोनचा EMI हा तुमच्या मासिक उत्पन्नाच्या १० टक्क्यांहून अधिक असणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच तुमचं मासिक उत्पन्न १ लाख रुपये असेल तर तुमचा ईएमआय हा १० हजार रुपयांहून जास्त असू नये.
कार लोन घेत असताना त्याचा अवधी ४ वर्षांचा असावा. अनेक बँका साधारणपणे ७ वर्षांपर्यांतच लोन टेन्युअर ठेवतात. मात्र यामुळे आपण मोठ्या प्रमाणात व्याज भरतो आणि आपलं नुकसान होतं. यासाठी कर्जाचा अवधी ४ वर्ष असल्यास लोन लवकर फेडलं जातं.
20:10: 4 फॉर्मुला लक्षात घेऊन ठरवा कारचं बजेट
हा फॉर्मुला लक्षात घेऊन त्यानंतर जर तुम्ही कारचं बजेट ठरवलं तर तुमच्यावर आर्थिक दबाव किंवा अडचणी नर्माण होणार नाहीत. समजा तुमचं मासिक उत्पन्न १ लाख रुपये आहे. म्हणजे तुम्ही महिन्याला १० हजार हप्ता भरू शकता. यानुसार ४ वर्षात तुम्ही एकूण ४.८ लाख रुपयांचे EMI भरू शकता. तुम्ही २ लाखांचं डाऊनपेमेंट केलं. तर एकूण रक्कम ही ६.८ लाख इतकी होते.
याचाच अर्थ १० लाख रुपये किमतीची कार ही तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत महाग ठरू शकते. यासाठी तुम्हाला ६.८ लाख रुपयांच्या बजेटमधील कार निवडावी लागेल. म्हणजेच जर तुम्ही ६-७ लाख बजेटची कार खरेदी केली तर ४ वर्षांत कमी व्याज देऊन तुम्ही सहज लोन फेडू शकता. याशिवाय जर तुमच्या पसंतीतील कार काही रुपयांनी जास्त असेलच तर डाऊनपेमेंट थोडे जास्त करण्याचा प्रयत्न करा.
हे देखिल वाचा-
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.