Besan And Milk: चेहऱ्यावर बेसन आणि दूध लावणे चांगले की वाईट, जाणून घ्या

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेकदा महिला घरगुती उपायांचा अवलंब करतात.
Besan
Besan sakal
Updated on

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेकदा महिला घरगुती उपायांचा अवलंब करतात. यामध्येही बेसन आणि दुधाच्या फेस पॅकचे नाव सर्वांच्या जिभेवर आहे. वर्षानुवर्षे महिला या नैसर्गिक उपायाचा वापर आपले सौंदर्य वाढवण्यासाठी करत आहेत. पण यातून खरोखर काही फायदा होतो का? त्यामुळे त्वचेची चमक वाढते का? चला तर जाणून घेऊया...

नॅचरल एक्सफोलिएटर- बेसन आणि दूध त्वचेतून मृत त्वचा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतात. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत. त्याच दुधात मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात. यासोबतच यामध्ये रेटिनॉल, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते, जे तुमच्या त्वचेला आतून पोषण देते आणि तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Besan
Vastu Tips: कारमध्ये या गोष्टी ठेवाच, संकट दूर गेलच म्हणून समजा

नको असलेले केस काढले जातात - बेसन आणि दुधाची पेस्ट उबटन म्हणून वापरू शकतो, चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यास मदत होते, हे एक प्रकारचे नॅचरल हेअर रिमूव्हल आहे, यासाठी बेसन आणि दुधासोबत लिंबाचा रस आणि गुलाबपाणी टाका. आणि चेहऱ्यावर लावा.

Besan
Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन अन् खाज त्रासदायक ठरतात; हे घरगुती उपाय करतील मदत

कोरडी त्वचा- त्वचेतील आर्द्रता टिकवण्यासाठी तुम्ही हा फेस पॅक देखील लावू शकता. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. कोरडी आणि खडबडीत त्वचा मऊ करण्यास मदत करते.

तेलकट त्वचेची समस्या दूर करते- बेसन आणि दुधाचा फेस पॅक लावल्याने तेलकट त्वचेची समस्या दूर होते. हे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमधून अतिरिक्त तेल काढण्यासाठी काम करू शकते. यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन आणि एक चमचा दूध एकत्र करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात हळदही घालू शकता. यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.