Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला 'या' चुका करू नका, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा १६ तारखेला साजरी केली जात आहे. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
Kojagiri Purnima 2024:
Kojagiri Purnima 2024:Sakal
Updated on

Kojagiri Purnima 2024: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. यंदा 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जात आहे. कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा म्हणतात. आजच्या रात्री अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे या दिवशी खीर किंवा मसाला दूध चंद्राच्या किरणांच्या प्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. पौर्णिमा देखील भद्राच्या सावलीत असेल.

शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी काही काम करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या शुभ दिवशी चुकूनही पुढील काम करू नका. धार्मिक मान्यतेनुसार पुढील चुका केल्यास माता लक्ष्मी कोपते, त्यामुळे लोकांना आर्थिक संकट आणि गरिबीचा सामना करावा लागतो. चला जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

घरगुती वाद टाळा

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात कोणाशीही वाद घालू नका. असे मानले जाते की या दिवशी घरामध्ये जास्त भांडण झाल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

विवाहित महिलांचा आदर

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरी येणारी विवाहित महिलेला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. विवाहित महिलांचा आदर करावा. त्यांच्याशी आदराने बोलावे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम कृपादृष्टी ठेवते.

पैसे देणे टाळा

ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दानासाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. परंतु संध्याकाळी पैशाचा व्यवहार करू नका. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

Kojagiri Purnima 2024:
Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा 16 की 17 ऑक्टोबरला? वाचा शुभ मुहूर्त

तामसिक अन्न सेवन करू नका

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार व मद्यपान करणे टाळावे. याशिवाय या खाद्यपदार्थांमध्ये कांदा, लसूण वापरू नका. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप पावणार नाही.

दूध देणे किंवा घेणे

असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध खरेदी किंवा विक्री करू नये. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते आणि व्यक्तीला जीवनात चिंतेचा सामना करावा लागतो.

काळे कपडे घालू नका

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. मान्यतेमुसार या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.