Kojagiri Pornima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला एकमेकांची तोंड पाहत बसू नका, हे खेळ खेळा, नात्यातील गोडवा होईल द्विगुणीत!

तुम्ही दुधाचा आस्वाद घेत काही खेळ फॅमिलीसोबत खेळू शकता. ज्यामुळे तुम्हाला कोजागिरी नेहमीच लक्षात राहील.
Kojagiri Pornima 2024
Kojagiri Pornima 2024 esakal
Updated on

Kojagiri Purnima 2024 :

वर्षातून एक पौर्णिमा अशी असते ज्याची सर्वजण वाट पाहत असतात. ती कोजागिरी पौर्णिमा उद्या साजरी केली जाणार आहे. पूर्वी फार कमी लोक कोजागिरी साजरी करायचे. पण आता कोजागिरी पौर्णिमेचे सामूहिकरित्या आयोजनही केले जाते. सोसायटी, कॉलनी, मित्र मंडळांच्या ग्रूपमध्ये अन् एकत्र कुटुंबात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते.  

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते अन् ते मसाले दूध आपल्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. त्यामुळे, पौर्णिमेदिवशी मसाले दुधाची पार्टीच असते. या वेळी तुम्ही दुधाचा आस्वाद घेत काही खेळ फॅमिलीसोबत खेळू शकता. ज्यामुळे तुम्हाला कोजागिरी नेहमीच लक्षात राहील.

Kojagiri Pornima 2024
Kojagiri Pournima: बुधवारी आदिमायेच्या दरबारात कोजागिरीचा जागर! राज्यातील मोठ्या कावड यात्रेसाठी हजारो कावडीधारक सीमेवर

 

कधी आहे कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima Date And Muhurta)

हिंदू पंचांगानुसार , यंदा अश्विन महिन्यात 16 ऑक्टोबरला बुधवारी 8:40 वाजता सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. 

Kojagiri Pornima 2024
Kojagiri Purnima: कोजागिरीला लक्ष्मी-इंद्राचे करावे पूजन; हवन करून गायीला नैवेद्य दाखविण्याचे आवाहन

घरातील सदस्यांसोबत तुम्ही लहानपणापासून एकत्र राहीलेले असता. त्यामुळे त्यांना काय आवडतं काय नाही, हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आवडीचे गेम्स नक्की खेळा. अशा गेम्समध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. ज्या तुम्हाला एकत्र आणतात. दुरावलेल्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा भरतात.

 

एकत्र चित्रपट पहा (Movie Time)

तुम्ही भावंडांसोबत, मित्रांसोबत अनेक चित्रपट पाहिले असतील. तोच प्लॅन तुम्ही आताही करू शकता. जेव्हा संपूर्ण कुटुंब, जवळचे मित्र उपस्थित असतात तेव्हा तुम्ही टेरेसवर स्क्रीन लावून चित्रपट पाहू शकता.

Kojagiri Pornima 2024
Kojagiri Purnima 2022: आटलेल्या दुधाचे आयुर्वेदिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्व काय? जाणून घ्या...

लग्नातील व्हिडिओ फोटो (Wedding Photo-Video)

कुटुंबातील सदस्यांचे लग्नाचे अल्बन पाहणे हा एक सुखद टाईमपास असू शकतो. त्यामुळे तुम्ही लग्नाचे फोटो, व्हिडिओ पहा. ज्यामुळे तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकता.

ऍक्टीव्हीटी गेम खेळा (Activity Games)

तुम्हीही फॅमिलीसोबत वेळ घालवताना ट्रूथ ऍन्ड डेअर, लपंडाव, पत्त्यांचे डाव, आईचं पत्र हरवलं असे खेळ खेळा. ज्यामुळे तुम्हाला लहान झाल्यासारखे वाटेल. तुम्ही बोर्ड गेम्सही खेळू शकता.

Kojagiri Pornima 2024
Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्रसन्न होणार; या ४ राशींची भरभराट होणार

पासिंग द पार्सल (Passing The Parcel)

पासिंग द पार्सल गेम हा एक प्रसिद्ध गेम आहे ज्यामध्ये पार्सल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिले जाते. खेळादरम्यान संगीत वाजते आणि प्लेअर्समध्ये एक ऑब्जेक्ट पास केला जातो, संगीत थांबताच, पार्सल हातात असणारी व्यक्ती इतर खेळाडूंनी दिलेले कार्य पूर्ण करते आणि ते गेममधून काढून टाकले जाते.

Kojagiri Pornima 2024
Kojagiri Purnima 2022: आटलेल्या दुधाचे आयुर्वेदिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्व काय? जाणून घ्या...

अंताक्षरी (Antakshari)

तुम्ही कितीही बेसुरे गात असला तरी फॅमिलीसोबत असताना गाताना भिती वाटत नाही. तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना फॅमिली अन् मित्रांसोबत अंताक्षरी खेळू शकता. अंताक्षरीत असलेली स्पर्धा सर्वच विसरून जातात अन् एकमेकांना गाणी आठवायला मदत करतात. तेव्हा नात्यातील गोडवा अधिक वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.