Kojagiri Purnima 2024 :  कोजागिरी पौर्णिमा स्पेशल दुधाचा मसाला कसा बनवायचा माहितीये का?

Kojagiri Purnima Recipe :कोजागिरीला मसाल्याचे दूध पिण्याची परंपरा आहे. मसाल्याचे हे दूध आपल्याला अनेकप्रकारे फायदे मिळवून देणारे आहे.
Kojagiri Purnima 2024
Kojagiri Purnima 2024esakal
Updated on

Kojagiri Purnima Recipe :

उद्या कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा घरातील सदस्य, सोसायटी, कॉलनीतील ग्रूप एकत्र साजरी करतात. कोजागिरीला मसाल्याचे दूध पिण्याची परंपरा आहे. मसाल्याचे हे दुध आपल्याला अनेकप्रकारे फायदे मिळवून देणारे आहे.

विविध ड्रायफ्रुट्स आणि स्वादिष्ट मसाल्यांनी बनवलेले मसाले दूध सर्वांसाठी चांगले आहे. पण, दुधासाठी प्रिझरवेटीव्ह्स वापरून केलेला मसाला आणू नका. तर, मसाले दुधासाठी घरीच मसाला बनवा. तुम्ही हा मसाला ताजाही वापरू शकता अन् तो साठवूनही ठेऊ शकता. हा मसाला कसा बनवायचा पाहुयात. 

Kojagiri Purnima 2024
Kojagiri Festival : दोन वर्षांनी उद्या कोजागरीचा उत्सव

साहित्य :

१०० ग्रॅम बदाम, १०० ग्रॅम पिस्ते, १ टे. स्पून वेलची पावडर, १ जायफळ किसून, २५ ग्रॅम चारोळी, २ ग्रॅम केशर.

Kojagiri Purnima 2024
Kojagiri Pornima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला एकमेकांची तोंड पाहत बसू नका, हे खेळ खेळा, नात्यातील गोडवा होईल द्विगुणीत!

कृती :

बदाम उकळत्या पाण्यात घालून साल काढून सुकवून मंद आचेवर बदाम, पिस्ते व चारोळी वेगवेगळे भाजून घ्या.

बदाम-पिस्त्याची मिक्सरवर जाडसर पूड करून त्यात वेलदोडे पूड़ जायफळ पूड केशर गरम करून हाताने चुरून मिसळावे.

वरील मिश्रणात चारोळ्या हलक्या कुटून मिसळा किंवा सबंध मिसळा व मसाला घट्ट झाकणाच्या बाटलीत भरा. वरील दुधाचा मसाला भरपूर होतो. खूप प्रमाणात करायचा असेल तर

बदाम, पिस्त्यांबरोबर शंभर ग्रॅम काजूपण घ्यावेत. हा मसाला कोजागिरीचे आटीव दूध, खीर, बासुंदी, श्रीखंड कशातही वापरता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.