Water for Health : आरोग्यदायी शरीरासाठी हवे पाण्याचे योग्य प्रमाण

चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे चांगले आहे. म्हणून एकाच फॉर्म्युल्याप्रमाणे सरसकट साऱ्यांनी पिणे योग्य होत नाही.
Drinking Water
Drinking Watersakal
Updated on
Summary

चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे चांगले आहे. म्हणून एकाच फॉर्म्युल्याप्रमाणे सरसकट साऱ्यांनी पिणे योग्य होत नाही.

कोल्हापूर - चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे चांगले आहे. म्हणून एकाच फॉर्म्युल्याप्रमाणे सरसकट साऱ्यांनी पिणे योग्य होत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, आजारानुसार, ऋतू तसेच कामाच्या स्वरूपानुसार शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. त्यानुसार शरीरात पाणी जाणे गरजेचे आहे. तरच ते आरोग्यदायी ठरते व त्याचा योग्य परिणाम दिसू लागतो. पाण्याचे योग्य प्रमाण हेच आरोग्यदायी शरीराचे खरे सूत्र असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात तसेच फिटनेस क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

- उदयसिंग पाटील

एकदम पाणी पिणे गरजेचे नसते

हृदय व किडनी चांगले काम करत असेल तर ०.०६ गुणीले वजन याप्रमाणे जो काही लिटरचा आकडा येईल, त्याच्या किमान ८५ टक्के तरी पाणी दिवसभरात पिले पाहिजे. जर दोन्हींची क्षमता कमी झाली असेल तर त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या हे साऱ्यांसाठी योग्य नाही. हृदय व किडनीचे रुग्ण असतात, त्यांच्यामध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्‍यक आहे. तसेच जेवणात पाणी पिऊ नये असे काही सांगतात. पण पूर्वी, मध्ये व नंतर पाणी पिणे गरजेचे आहे. फक्त ते योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. झोपताना वा सकाळी उठल्यानंतर एकदम पाणी पिणे गरजेचे नाही. तसेच दिवसभरात टप्प्याटप्प्याने घेतले गेले पाहिजे.

- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोगतज्ज्ञ

पोट साफ होण्यास मदत

भारतीय वातावरणाचा म्हणजे उष्णतेचा विचार केला तर दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी शरीरासाठी आवश्‍यक आहे. मी घरात आहे म्हणून कमी पाणी चालते असे नाही. दिवसभरात हळूहळू, टप्प्याटप्प्याने पाणी शरीरात गेले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर दिड लिटर पाणी सावकाश घेतले तर पोट साफ होण्यास मदत मिळते. ॲसिडिटी कमी होते. पोट साफ झाल्यास चांगली भूक लागते. भूक चांगली लागून जेवण गेल्यास चांगली झोपही येते. त्यातून चांगले आरोग्य राखले जाते. उन्हाळ्यात तर शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी विविध मार्ग अवलंबले पाहिजे. त्यासाठी पाणीदार फळे खाणे केव्हाही चांगला पर्याय आहे.

- डॉ. रवीकुमार जाधव, होमिओपॅथी कन्स्लटंट

...तर पडतो आजारांचा विळखा

पाणी म्हणजे जीवन आहे, शरीरातही त्याचे प्रमाण भरपूर आहे. ते कमी झाले की शरीराची प्रक्रिया बिघडण्यास सुरूवात होते व निरनिराळ्या आजारांचा विळखा पडतो. त्यातून त्या व्यक्तिला पाणी पिण्याचे प्रमाण सांगितले जाते. त्यांच्याशी संबंधित अनेकजण तोच सल्ला शिरोधार्ह मानून स्वतःला लागू करून घेतात. पाणी पिणे चांगले असले तरी ते सूट होते की नाही हे पाहिलेच जात नाही. परिणामी वेगळे आजार सतावण्यास सुरूवात होते. त्यासाठी निरोगी व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यायला हवे हे प्रमाण जरी ठरलेले असले तरी साऱ्यांनी तेच ठेवले पाहिजे असेही नाही, असेही डॉक्टरांचे मत आहे.

फळांमधूनही पाण्याचे प्रमाण वाढवा

शरीरातील प्रमाण राखण्यासाठी दिवसभरात केवळ पाणीच प्यायचे म्हटले तर अनेकांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे पाणी पिण्यास टाळाटाळ केली जाते व शरीरातील प्रमाण बिघडते. यापेक्षा पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाणे हाही एक चांगला पर्याय आहे. दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी शरीरात गेले पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटावर एक ग्लास पाणी पिणे आरोग्यदायी ठरू शकते. तसेच जेवणाआधी अर्धा तास पाणी पिण्याची सवय ठेवावी. त्यामुळे जेवण पचण्यास मदत करणारे पोटातील घटक चांगल्या प्रकारे काम करू शकतील.

- डॉ. मनाली चौगुले, आहारतज्ज्ञ

अतिप्रमाण त्रासदायक होऊ शकते

पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन होऊन तक्रारी सुरू होतात. सारी सिस्टीम बिघडून टाकते. तसेच जास्त प्रमाणात घेतल्यासही परिणाम होतो. त्यामुळे प्रकृतीनुसार तहान किती लागते यावर पाण्याचे प्रमाण त्या-त्या व्यक्तीने ठरवण्याची गरज आहे. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये. तसेच उन्हातून आल्या-आल्या लगेच पाणी पिण्यापेक्षा १५ ते १० मिनिटांचा वेळ गेल्यानंतर बसून हळूहळू प्यावे. रात्री झोपतानाही गरजेनुसारच पाणी प्यावे. म्हणून ऋतू, प्रकृती व कामाचे स्वरूप यावर पाण्याचे प्रमाण ठरवले गेले पाहिजे. कुणी तरी सांगते म्हणून साऱ्यांना तेच प्रमाण लागू होऊ शकत नाही.

- डॉ. योगेश जोशी, होमिओपॅथी कन्स्लटंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()