कोरियन मुली इतक्या सुंदर का दिसतात? हे आहे सिक्रेट

कोरियन ब्युटी प्रोडक्ट्स जगभरात लोकप्रिय आहेत.
k beauty
k beauty esakal
Updated on

जगात सर्वात सुंदर व्यक्ती कोण? असं कोणाला विचारलं तर सध्या एकच उत्तर मिळतंय ते म्हणजे कोरियन. कोरियन मुला-मुलींचं सौदर्य (K Beauty) हा जगात चर्चेचा विषय आहे. असं काय बरं लावत असतील ते चेहऱ्याला (Face) कि ज्यामुळे त्यांची ओळख जगभरात (World) निर्माण झाली आहे.

त्वचेची (Skin Care) काळजी आपण सगळेच घेतो. त्यासाठी जगभरातले लोकं विविध उपाय करतात. पण कोरियन सौंदर्य आवडत असल्याने आता लोकं कोरियन स्कीनकेअर वापरायला लागले आहेत. के-ब्युटीने (K Beauty)आधुनिक आणि पारंपारिक घटकांचा मिलाफ करून आपली भुरळ पाडली आहे.

ट्रेंड (Trend) म्हणून विचार केल्यास, लोकं कोरियन लोकांच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवत आहेत. बेलिफ येथील सौंदर्य तज्ज्ञ १९ व्या शतकातील एपोथेकरी तंत्राविषयी म्हणाले की, कोरियन स्किनकेअर हे वेगळ्या घटकांचा शोध घेत त्याची तंत्र आणि फॉर्म्युला समजून घेत वापर करण्यावर भर देत असल्याने कोरियन लोकांना त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी उपाय मिळाले आहेत. ते साधारणपणे या घटकांचा वापर सौंदर्यप्रसाधनांसाठी करतात.

k beauty
Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स
k beauty
k beauty esakal

हे घटक कोरियन ब्युटी ट्रेंडमध्ये वापरले जातात

गाजराच्या बियांचे तेल (Carrot seed oil)

के ब्युटीमध्ये (K Beauty Trend) गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ गाजराच्या बियांचे तेल (Carrot seed oil) वापरले जात आहे. यात व्हिटॅमिन ए असते आणि ते उत्तम अॅंटीऑक्सिडंट आहे. हे अँटी-एजिंग, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी आहे. त्यामुळे हे तेल वापरल्याने त्वचा चांगली उजळते. के ब्युटी ब्रॅंड्स लोकप्रिय झाल्यापासून स्किनकेअरसाठी उपयुक्त असणाऱ्या तेलांमध्ये या तेलाला खूप मागणी आहे.

स्लगिंग ( Slugging)

के ब्युटी ट्रेंडने (K Beauty Trend) मॉइश्चरायझिंगला नवा आयाम दिला आहे. यात तुम्ही रात्री झोपण्याआधी पेट्रोलियम जेली लावणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर्स आणि सीरममधील सर्व गुण उतरतात. त्यामुळे तुमच्या त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. यामुळे त्वचेला संरक्षण मिळते.

ऍसिड लेयरिंग (Acid layering)

के ब्युटी (K Beauty) प्रोडक्ट्स फक्त ऍसिड हा घटक मान्य करत नाही. तर ऍसिड लेयरिंग तंत्र AHAs आणि BHA यासारख्या ऍसिडचे संतुलन करते. यामुळे चेहऱ्यावरची अनावश्यक सालपट गळून पडतात. त्यानंतर तुमच्या त्वचेला मुलायम पोत येतो.

k beauty
कोरियन फूड आवडतंय, मग, ही 5 पुस्तके नक्की वाचा
k beauty
k beauty esakal

मधाचा वापर (Glass and honey skin)

कोरियन लोकांना नैसर्गिक गोष्टी ठेवणे आवडते. ग्लास आणि मध यांच्या वापरामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. मधाचा स्कीनकेअरमध्ये वापर करताना त्याली लेयरिंग हायड्रेटिंग उत्पादने त्वचा उजळ तर होतेच. शिवाय मॉइश्चरायझ झाल्याने ग्लो मिळतो. ग्लास स्कीन म्हणजे त्वचेची छिद्र (poreless finish) मोकळी होऊन चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम राहतेच, शिवाय त्वचेचा पोतही त्यामुळे सुधारतो.

स्किनिमलिझम (Skinimalism)

स्किनकेअर (Skincare) उत्पादनांचा विचार करता स्किनिमलिझम म्हणजे अगदी आवश्यक वस्तू निवडणे. ते तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अधिक बारकाईने काम करून तयार केलेले असल्याने प्रभावी आहे. मात्र त्यासाठी उत्पादनाचा खूप अभ्यास केलेला असतो.

सौम्य रेटिनॉल्स (Mild retinols)

रेटिनॉल हे प्रभावी स्किनकेअर घटकांपैकी आहे. हे वापरल्याने तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. त्वचा उजळते आणि ब्रेकआट्स कमी करते. पण हे सोलश्युन अत्यंत काळजीपूर्वक आणि माफक प्रमाणात वापरला जाणे खूप गरजेचे आहे. कोरियन ब्युटी उत्पादनात आता कमी क्षमतेमध्ये रेटिनॉल वापरले जात आहे. कारण ते परिणाम न बदला त्वचेवर कोणताही धोका निर्माण करत नाहीत.

k beauty
शमिता शेट्टीचं ग्लुटेन फ्री डाएट माहितेय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()