Nipah Virus: केरळमधील मृत्यूमागे निपाह व्हायरस! जाणून घ्या हा व्हायरस किती धोकादायक आहे? शरीराला कशी हानी पोहोचते?

दोन्ही रुग्णांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
nipah virus
nipah virussakal
Updated on

दक्षिणेकडील केरळ राज्यात पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता आहे. कोझिकोड जिल्ह्यात तापामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दोन मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून निपाह व्हायरस हे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एकाच्या नातेवाईकाची प्रकृतीही गंभीर असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विभाग सतर्क

तापाने दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, निगराणी सुरू करण्यात आली असून मृतांचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत.

त्यांनी सांगितले की, मृतांचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी सांगितले की एक 9 वर्षांचा आणि 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दोघांचे नातेवाईक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

nipah virus
Side Effects of Haldi Milk: हळदीचे दूध पिताय? हे आजार असणाऱ्यांसाठी ठरू शकते घातक, चुकूनही पिऊ नका

तसेच जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या पथकाला सतर्क राहण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये आयसोलेशन सुविधा निर्माण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सध्या दोन्ही मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

प्राण्यांपासून निपाह व्हायरस पसरतो

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो.

मलेशियातील सुंगाई निपाह या गावात 1999 मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे.

हा विषाणू कसा पसरतो?

असे मानले जाते की हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. असे मानले जाते की ते डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील पसरू शकते.

जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर तो इतरांनाही संक्रमित करू शकतो. याचा अर्थ, एकामुळे इतर लोकांना देखील संसर्ग होऊ शकतो.

निपाह व्हायरस किती धोकादायक आहे?

निपाह व्हायरस कमी संसर्गजन्य परंतु अधिक प्राणघातक मानला जातो. याचा अर्थ असा की कमी लोकांना याची लागण होऊ शकते, परंतु मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये जेव्हा निपाह विषाणूचा प्रसार झाला तेव्हा त्याचा मृत्यूदर ४५ ते ७० टक्के होता.

एवढेच नाही तर निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत निपाह बाधित व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

nipah virus
Health Care News: पुरेशी झोप घेतल्याने तुमच्या स्वभावात होईल चांगला बदल, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

निपाह व्हायरसची लक्षणे कोणती?

जर एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसतात.

त्याच वेळी, परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.