- विजया दुर्धवळे, संस्थापिका, क्रांतिज्योती महिला मंच
‘क्रांतिज्योती महिला मंच’ ही संस्था म्हणजे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला उपक्रम आहे. सन्मानपूर्वक जीवन, उत्तम आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन ही ‘क्रांतिज्योती’च्या कामाची त्रिसूत्री आहे.
समाजातल्या सर्वांत शेवटच्या - उपेक्षित महिलेला ‘प्रथम प्राधान्य’ हे ‘क्रांतिज्योती महिला मंच’चे धोरण आहे. या धोरणांनुसारच समाजातल्या विधवा, वृद्ध, एकाकी महिलांना संघटित करून एका बाजूला या महिलांना रेशनची सुविधा असो अथवा वेगवेगळ्या पेंशन योजना यांचा लाभ मिळवून देण्यासाठी एका बाजूला शासन दरबारी ‘धोरण वकिली’ करणे आणि दुसऱ्या बाजूला महिलांना संघटित करून मोर्चे, निदर्शने इत्यादी रस्त्यावरची आंदोलने संघटित करणे आणि संघर्ष करणे या दोन्ही आघाड्यांवर संघटना कार्यरत आहे.