उशीरा लग्न केल्याने नात्यावर होतात ४ परिणाम

लग्न करण्यासाठी स्वत:ची एक वेळ घेणे अगदी बरोबर आहे
late Marriage
late Marriage
Updated on

लग्न कधी करावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण आपल्याकडे साधारण मुलगी २४, २५ वर्षांची आणि मुलगा कमावता म्हणजे २७, २८ वर्षांचा झाला कि त्याच्या लग्नाचं बघायला लागतात. घरातून,नातेवाईक, मित्र-मैत्रीणींकडून याबाबत त्यांना विचारणा होते. काहीजण तर दबाव टाकतात. लग्न करण्यासाठी स्वत:ची एक वेळ घेणे अगदी बरोबर आहे. पण उशीरा लग्न केल्यानेही अनेक समस्या येऊ शकतात. त्या समस्या समजून घेऊन कपल्सनी लवकर लग्न करणे गरजेचे आहे.

late Marriage
बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार
Couple
Couple

होतात ४ परिणाम

भांडणं वाढतात- उशीरा लग्न झाल्याने जबाबदारी आणि प्राथमिकता बदललेली असते. अशावेळी जोडपी एकमेकांना नीट समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायला सुरूवात होते. वय वाढल्यावर तुमचा इगोही वाढतो. त्यामुळे साहजिकच दोघांच्यात भांडणे वाढण्याची शक्यता जास्त असते.

शारीरिक जवळीक नसणे- वय वाढल्यावर अनेक स्त्रियांना शारीरिक जवळीक नकोशी वाटते. त्या उदास राहू लागते. यामुळे नवरा बायकोतील भांडणं वाढतात. तसेच पुरूषांमध्ये वाढत्या वयामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जवळीकांमधील रस संपतो.

late Marriage
बायकोने नवऱ्याच्या नकळत त्याचा फोन बघणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
couple arguments
couple argumentsEsakal

वंध्यत्व वाढण्याची शक्यता- महिलांमध्ये तिशीनंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. पस्तीशीनंतर ती अधिक वेगाने कमी होते. स्त्री जसजशी मोठी होते तशी तिची गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते आणि वंध्यत्वाची शक्यता वाढते.

नात्याला जास्त महत्व देत नाही- आजच्या धावपळीच्या जगात मुलगा- मुलगी दोघेही नात्यापेक्षा करिअरला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना योग्य वयात लग्न करता येत नाही. उशिरा लग्न करूनही ते नात्यापेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे नात्यात दुरावा येतो.

late Marriage
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.