Leaf For Diabetes :भारतात झपाट्याने वाढणारा आजार म्हणून मधुमेहाकडे पाहिले जाते. आजकाल वयाची तिशी ओलांडलेल्या व्यक्तीलाही मधुमेहाची लागण होत आहे. मधुमेह फक्त गोड खाणऱ्या लोकांना होतो, असा एक समज भारतात आहे. पण, तसं नाही. मधुमेह होण्याची अनेक कारणे आहेत.
जेव्हा अन्नातून जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट शरीरात जाऊ लागतात तेव्हा समस्या उद्भवते. यासाठी, इन्सुलिन नावाचा हार्मोन स्वादुपिंडात सक्रिय होतो आणि अतिरिक्त प्रमाणात ग्लुकोज शोषण्यास सुरुवात करतो.
कोणत्याही कारणाने इन्सुलिन कमी झाल्यास रक्तामध्ये ग्लुकोज जमा होण्यास सुरुवात होते आणि मधुमेहाचा आजार होतो. अशा या गंभीर आजारावर अनेक औषधे उपलब्ध असली. तरी हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण, काही उपाय केल्याने आपण यातून सुटका करून घेऊ शकतो. (Diabetes)
आयुर्वेदाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत ज्यांचा वापर करून आपण स्वतःला निरोगी ठेवू शकतो. मधुमेहाच्या बाबतीतही असेच काहीसे घडते. मधुमेहामध्ये साखरेचे चयापचय वेगवान करणे ही पहिली गरज असते. याशिवाय इन्सुलिनचे उत्पादन वाढवणे देखील आवश्यक आहे.
निसर्गात आढळणाऱ्या काही झाडांची पाने तुम्हाला या कामात मदत करू शकतात. या पानांची खास गोष्ट म्हणजे त्यांचा अर्क मधुमेहामध्ये साखरेचे चयापचय वेगवान करू शकतो आणि साखरेचे प्रमाण वाढण्यापासून सहज रोखू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहामध्ये आराम देणारी काही पाने आणि त्यांचे सेवन करण्याची पद्धत.
डायबिटीजमध्ये या 4 पानांचे सेवन करा
जांभळाचे पान
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ,नुसार जांभळाची पाने मधुमेहामध्ये जास्त परिणामकारक ठरतात. ही पाने इंसुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेला गती देतात. आणि साखरेचे पचन करतात. मधुमेहामध्ये तुम्ही जांभळाची पाने चावून खाऊ शकता.
या पानांची पावडर पाण्यासोब घेऊ शकता. हे केवळ रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करत नाही. तर हृदय आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर उपचार करण्यासाठी नैसर्गिक मार्गाने कार्य करते.
इन्सुलिनचे पान
भारतातील प्रत्येक मधुमेही रुग्णाच्या घरात तुम्हाला एक इन्सुलिन प्लांट मिळेल.तुम्हाला हे नर्सरीमध्येही मिळेल. इंसुलिनच्या पानांचा अर्क शरीरात साखर पचवताना जसे काम करते त्याच पद्धतीने काम करते. हे फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्समध्ये समृद्ध आहे जे साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हळूहळू पचन करण्यास मदत करते. त्यामुळे चहामध्ये इन्युलिनची पाने टाका. किंवा पानांची पावडर पाण्यात मिसळून प्या.
शेवग्याची पाने
शेवग्याच्या पानांना वैद्यकीय भाषेत मोरिंगा (मोरिंगा ओलिफेरा) म्हणतात. हा मोरिंगा खरं तर मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे. चहामध्ये मिसळून प्यायल्याने तुम्ही मधुमेहाची अनेक लक्षणे नियंत्रित करू शकता. हे इंसुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते आणि नंतर शरीरातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. (Health Tips)
शतावरीची पाने
शतावरी ही एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने अनेक प्रकारच्या औषधांच्या निर्मितीसाठी बनवली जातात. व्यक्तीला टाइप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास शतावरीची पाने मदत करू शकतात. वनस्पतीमध्ये जिन्सेनोसाइड्स नावाचे सक्रिय घटक असतात जे रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी इंसुलिन आणि ग्लुकागन स्थिर करू शकतात. त्यामुळे शतावरीची पाने घेऊन पाण्यात उकळून हे पाणी प्या. (Home Remedies)
मधुमेहाच्या रूग्णांना वेळोवेळी उपचारांची आवश्यकता असते. कारण, एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल तर साखरेची पातळी कमी जास्त झाल्याने मधुमेही रूग्णांना त्रास होतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करा. यासाठी योग्य आहार, वेळोवेळी औषधं आणि व्यायामाचा समतोल राखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.