दरवर्षी 8 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी 8 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ (World Oceans Day) म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की, "महासागर आपल्या ग्रहाचे फुफ्फुस आहेत, जो आपण श्वास घेतो तो बहुतेक ऑक्सिजन प्रदान करतो". त्यामुळे महासागराचे आणि त्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण संवर्धन केले पाहिजे.
2008 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) यांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले आणि संपूर्ण जगात 8 जूनला जागतिक महासागर दिन साजरा होऊ लागला. आधी हा दिवस 2002 सालापासून UNESCO च्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येत होता, पण त्याच स्वरूप लहान होतं. जगभरातल्या सगळ्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला प्रत्येकांच्या आयुष्यात प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.
1) महासागराचे समुद्र किनारे स्वच्छ ठेवा : आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण आपल्या वाढत्या गरजेचा नको असलेला भाग म्हणजे कचरा निसर्गाचा माथी मारुन मोकळे होतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाची नैसर्गिक हानी होत आहे.
2) समुद्रकिनारी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पिकनिकला गेल्यास याठिकाणी अन्न पदार्थ, पेय, त्यांची पाकिटे, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आपण तिथे न फेकता कचरापेटी टाकाव्यात. कारण, आपण जर का तिथे असा कचरा टाकला तर तो तेथील सजीवांसाठी धोकादायक आहे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थानां एकत्र येऊन वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून हे समुद्रकिनारे स्वच्छ केले पाहिजेत.
3) आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे. कापडी पिशव्या वापरल्या पाहिजे. कारण, प्लास्टिकच्या पॉलिथीन, प्लास्टिकच्या बाटल्या, इतर प्लास्टिक वस्तू आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अशी प्लास्टिक जी सडत नाही आणि पुन्हा वापरली जात नाही, ती आपल्या वातावरणात वर्षानुवर्षे अशीच राहतात. एक अहवाल असं सांगतो की, प्लास्टिक पिशव्या समुद्रात टाकल्याने दरवर्षी दहा लाखाहून जास्त जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो. म्हणजे काय तर समुद्राची हानीच होते.
4) कॉस्मेटिक उत्पादने कमीत कमी करा शक्य असले तर तो टाळाचं.. : आजच्या युगात, सौंदर्य उत्पादनांचा भरपूर वापर होत आहे. अशा परिस्थितीत ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांकडून बर्याच कचरा तयार होतो, जो समुद्रापर्यंत टाकला जातो.
5) हा कचरा समुद्रातून बाहेर काढणे अशक्य आहे. सौंदर्य उत्पादने आणि पॅकेजेसमध्ये वापरल्या जाणार्या मायक्रोबीड्स आणि मायक्रोप्लास्टिक्स महासागरापासून फिल्टर करणे अशक्य आहे. सौंदर्यप्रसाधनांमधील ही विषारी रसायने नदी नाल्यामधून महासागरामध्ये जातात, यामुळे पर्यावरणाला नुकसान होते. यामुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.