Kartiki Ekadashi 2023 : चंद्रभागा नदीला वारकऱ्यांची बहिण का म्हटलं जातं? वाचा तिच्या जन्माची गाथा

भीमरथीचे 'चंद्रभागा हे नाव कसे पडले?
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023 esakal
Updated on

Kartiki Ekadashi 2023 :

कार्तिक महिन्यात होणाऱ्या कार्तिकी वारीला वारकरी पंथात महत्त्वाचे स्थान आहे. जसे आषाढी वारीला वारकरी पंढरपुरात गर्दी करतात,तसेच या वारीलाही भाविकांची मांदियाळी चंद्रभागेतीरी पहायला मिळते. आधी चंद्रभागेत स्नान करायचे आणि मग विठू माऊलीचे दर्शन घ्यायचे, हा नियम वारकरी अनेक वर्षांपासून पाळत आहेत.

जेव्हापासून वारीला सुरूवात झाली तेव्हापासूनच वारकऱ्यांचा तळ आधी चंद्रभागेच्या वाळवंटात उतरतो. आणि मगच पुढे विठ्ठलाच्या चरणी लीन होतो. वारकरी सांप्रदायात चंद्रभागा नदीला वारकऱ्यांची भगिनी म्हणजेच बहिण म्हटले आहे. माझी बहिण चंद्रभागा, करितसे पापभंगा या पंडित भिमसेन जोशी यांच्या ओळी याचीच प्रचिती देतात.

चंद्रभागेला लोक भीवरा, भीमरथी असेही म्हणतात. वारकऱ्यांना पापातून मोक्ष देणारी ही चंद्रभागा माऊलीच आहे. महाराष्ट्रातील अंभंगात, भजनात,लोकगीतात, जात्यावरील गाण्यात, विवाहाच्या गाण्यात, शेतात काम करताना लोकांच्या ओठी आपसुकच चंद्रभागेच्या तिरावरील गाणी, ओव्या असतात.

Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi: अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशीला महापूजा मान कोणाला? मंदिर समितीसमोर मोठा पेच

आषाढी-कार्तिकी यात्रेच्या वेळी या वाळवंटातील शोभा अवर्णनीय असते. चंद्रभागेत स्नान करणाऱ्या दर्शनार्थीची प्रचंड गर्दी उसळलेली असते. कितीतरी लोक चंद्रभागेत असतात आणि कितीतरी महाद्वाराच्या पायऱ्या चढत असतात. कित्येकही दिंड्या टाळ-मृदंगाचा घोष करीत, झेंडे, पताका फडकवीत, वाळवंटात ये-जा करीत असतात.

'जय जय विठ्ठल-रखुमाईच्या' नामसंकीर्तनाने आसमंत गर्जून जातो. स्नान केल्यानंतर वारकरी एकमेकांचे चरण धरून दर्शन करताना दृष्टीस पडतात. तेथे लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच भेद राहात नाही. ते केवळ भक्तिभावाचे राज्य असते.

भगवदभक्ताची, वारकऱ्यांची लाडकी बहीण आहे. थोरली बहीण लहान भावाला कडेवर घेऊन देवदर्शनाला जाते. अगदी तशीच, पांडुरंगाचे दर्शन करविणारी म्हणून तर प्रथम बहिणीचा आशीर्वाद आणि पुढे दर्शन असा नियम आहे. पंढरीनाथाचे, द्वारकानाथाचे, रुक्मिणीवराचे

Kartiki Ekadashi 2023
Rama Ekadashi 2023 : रमा एकादशी कधी आहे?जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

असमद भागवताच्या पाचव्या स्कन्धातील १६ व्या अध्यायात भारत वर्षातील महानद्यांच्या वर्णनात चंद्रभागेला 'भीमरथी चंद्रभागा' असे म्हटले आहे. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये "गोदावरी नर्मदांच बहुदांच महानदीम, शतद्रं चंद्रभागां भीमादीम् असा चंद्रभागेचा उल्लेख आहे.

भीमरथीचे 'चंद्रभागा हे नाव कसे पडले, त्याविषयी 'स्कन्द पुराणातील कथा

त्रिपुरासुराने त्रैलोक्याला त्रस्त करून सोडले. देवी-देवता भगवान शिवांना शरण गेले व त्यांना त्रिपुरासुराचे पारिपत्य करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी एक चरण पृथ्वीवर व एक चरण नंदीश्वरावर ठेवून त्रिपुराशी तुंबळ युद्ध करून त्याला जिंकले. युद्धातील श्रमाने भगवान शिवांना घाम आला.

तोच घाम नदीचे रूप घेऊन पंढरपूर क्षेत्राच्या दर्शनाला पुढे-पुढे निघाला. नदीचा भयंकर शब्द ऐकून क्षेत्रवासी भयभीत झाले आणि क्षेत्रपाल भैरवाला शरण गेले. ते त्यांना नमस्कार करून विनंती करू लागले,

"हे देव भैरव, आमच्या क्षेत्रावर काहीतरी भयंकर अरिष्ट आले आहे. ऐका तर खरं. प्रलयकालच्या मेघगर्जनेप्रमाणे प्रचंड शब्द होत आहेत. आमचा सांभाळ करा." भैरवाने सर्वांना अभय दिले. त्याला क्रोध आला आणि तो हातात दंड घेऊन नदीकडे निघाला. भीमरथी भैरवाचे अक्राळविक्राळ रूप पाहून भयभीत झाली. तिने पांडुरंगाची स्तुती आरंभिली.

"हे विठ्ठला जगन्निवासा, हे जगदुद्धारका, दयासिन्धो, आपण गजेंद्राला नक्रापासून वाचविले तसे मला या क्षेत्रपालापासून वाचवावे." भगवंत म्हणाले, "भीमे, तू भयभीत होऊ नकोस. मी तुला अभय देतो. मात्र या भागातून जाताना तू निःशब्द होऊन जावेस. तुझ्या दर्शनानेच पाप्यांची पापे नष्ट झाली पाहिजेत."

चंद्रभागा नदीच पात्र
चंद्रभागा नदीच पात्र esakal
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकीची महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार? मराठा क्रांती मोर्चाचा दादांना तीव्र विरोध

भीमरथीने आज्ञा मान्य केली. आजही प्रभूची आज्ञा म्हणून ती कितीही पूर आला तरी शब्द न करता येथून प्रवाहित होते. त्यामुळे येथे भीमरथी 'पापविनाशिनी' झाली आहे. काहींच्या मान्यतेप्रमाणे मांडण खडकी हे मांडव्य ऋषींचे स्थान असून तेथून विष्णुपदापर्यंत भीमरथीला चंद्रभागा असे नाव आहे.

भगवदभक्ताची, वारकऱ्यांची लाडकी बहीण आहे. थोरली बहीण लहान भावाला कडेवर घेऊन देवदर्शनाला जाते. अगदी तशीच, पांडुरंगाचे दर्शन करविणारी म्हणून तर प्रथम बहिणीचा आशीर्वाद आणि पुढे दर्शन असा नियम आहे.

महाभारतातील भीष्म पर्वामध्ये "गोदावरी नर्मदांच बहुदांच महानदीम, शतद्रं चंद्रभागां भीमादीम् असा चंद्रभागेचा उल्लेख आहे. पद्य पुरणांतर्गत 'ततो निवृत्त आपात पश्यन्भीमरथी तटे, द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भुक्तिमुक्तिप्रदायकम्' असा भीमरथीचा उल्लेख आलेला आहे.

त्रिपुरासुराने त्रैलोक्याला त्रस्त करून सोडले. देवी-देवता भगवान शिवांना शरण गेले व त्यांना त्रिपुरासुराचे पारिपत्य करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी एक चरण पृथ्वीवर व एक चरण नंदीश्वरावर ठेवून त्रिपुराशी तुंबळ युद्ध करून त्याला जिंकले.

युद्धातील श्रमाने भगवान शिवांना घाम आला. तोच घाम नदीचे रूप घेऊन पंढरपूर क्षेत्राच्या दर्शनाला पुढे-पुढे निघाला. नदीचा भयंकर शब्द ऐकून क्षेत्रवासी भयभीत झाले आणि क्षेत्रपाल भैरवाला शरण गेले. ते त्यांना नमस्कार करून विनंती करू लागले,

Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi : कार्तिकी महापूजेचा पेच आज सुटण्याची शक्यता, कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा?
चंद्रभागेत स्नान करण्यासाठी उसळलेला जनसागर
चंद्रभागेत स्नान करण्यासाठी उसळलेला जनसागरesakal

"हे देव भैरव, आमच्या क्षेत्रावर काहीतरी भयंकर अरिष्ट आले आहे. ऐका तर खरं. प्रलयकालच्या मेघगर्जनेप्रमाणे प्रचंड शब्द होत आहेत. आमचा सांभाळ करा." भैरवाने सर्वांना अभय दिले. त्याला क्रोध आला आणि तो हातात दंड घेऊन नदीकडे निघाला. भीमरथी भैरवाचे अक्राळविक्राळ रूप पाहून भयभीत झाली. तिने पांडुरंगाची स्तुती आरंभिली.

"हे विठ्ठला जगन्निवासा, हे जगदुद्धारका, दयासिन्धो, आपण गजेंद्राला नक्रापासून वाचविले तसे मला या क्षेत्रपालापासून वाचवावे." भगवंत म्हणाले, "भीमे, तू भयभीत होऊ नकोस. मी तुला अभय देतो. मात्र या भागातून जाताना तू निःशब्द होऊन जावेस. तुझ्या दर्शनानेच पाप्यांची पापे नष्ट झाली पाहिजेत."

भीमरथीने आज्ञा मान्य केली. आजही प्रभूची आज्ञा म्हणून ती कितीही पूर आला तरी शब्द न करता येथून प्रवाहित होते. त्यामुळे येथे भीमरथी 'पापविनाशिनी' झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.