Legal Advice : मित्राला उधारी दिलीय पण पुरावा नाही? कायदेशीर डोकॅलिटी लढवली तरी चटकन परत मिळतील पैसे

Legal Advice : जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे दिले असतील आणि तो आता नाही दिले असे म्हणत असेल.आणि त्याला पैसे दिल्याचा एकही पुरावा तुमच्याकडे नसेल. तर, हतबल होण्याची गरज नाही.
Legal Advice
Legal Adviceesakal
Updated on

Legal Advice :

एखाद्याला मदत केल्यानंतर तो आपले पैसे परत देईलच अशी शास्वती नसते. आजकाल अनेक मारामाऱ्या, खून हे प्रकार उधारीच्या पैशांवरून होत आहेत. अशावेळी मित्राला दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसात जाणं हे योग्य ठरतं. पण, तिथे पुरावा लागतो.

जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे दिले असतील आणि तो आता नाही दिले असे म्हणत असेल.आणि त्याला पैसे दिल्याचा एकही पुरावा तुमच्याकडे नसेल. तर, हतबल होण्याची गरज नाही.

Legal Advice
साठेखत, खरेदीखत, भाडेपट्टा, गहाणखत म्हणजे काय? आणि ही नोंदणी गरजेची का? कायदेतज्ज्ञ सांगतात..

तुम्हाला पुरावा मिळवून देण्यासाठी तुमचा मोबाईल पुरेसा आहे. मोबाईलवरून पाठवलेल्या पैशांची माहिती आपल्या मोबाईलच्या Online Payment App मध्ये असते. पण, जर पैसे कॅश स्वरूपात घेतले असतील. तर याचा पुरावा तोंडी असतो. तो कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. या बद्दलची माहिती expert_vakil या इन्स्टा पेजवरून देण्यात आली आहे.

अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीला फोन करून पैसे परत देण्याबाबत विचारणा करा. त्या व्यक्तीने देत नाही, किंवा थोड्या दिवसांनी देतो अशी उत्तर दिली. तर तो तुमच्यासाठी या व्यवहाराचा पुरावा ठरू शकतो.

Legal Advice
Maamla Legal Hai Trailer : कोर्टातच जेव्हा उडतात हास्याचे फवारे! 'मामला लीगल है' ट्रेलर एकदा पाहाल तर खळखळून हसाल

तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की, तुमच्या मित्राकडे पैसे कधी देणार अशी विचारणा केल्यानंतर तो फोन रेकॉर्ड करा. यानंतर The Indian Evidence Act अंतर्गत तुम्ही याचे सर्टिफिकेट काढून कोर्टात केस दाखल करता येते.

Legal Advice
Germanany Officially Legalizes Marijuana: जर्मनीमध्ये गांजाला कायदेशीर मान्यता पण... ! वाचा काय आहे नवा कायदा

खरंच असा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जातो का, याबद्दल ऍड.शितल शिंदे मॅडम यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

अशा केसेसमध्ये हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. तो फायद्याचा आहेच. कारण, पुरावे नसतील तर केस सादर केली जाऊ शकत नाही. पण, हा पुरावा मिळवणं सोप्प असलं तरी इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो.

Legal Advice
Legal Will: आई वारल्यानंतर आता तिचे विल रजिस्टर कसे करावे?

कोर्टाची पायरी चढली की पैसा किती खर्च होईल याचा विचार केला जात नाही. कारण, कोर्ट कचेरीत लाखो रूपये जाऊ शकतात. जर तुम्ही मित्राला दिलेली रक्कम लाखोंच्या घरात असेल तरच कोर्टात जाण्याचा अन् केस दाखल करण्याचा विचार करा.

कारण, तुमची रक्कम छोटी असेल तर अशाप्रकारे पुरावा मिळवणे खर्चिक ठरू शकते. कारण, हा पुरावा मिळवल्यानंतर सायबर सेलकडील तज्ज्ञ व्यक्तींकडून तो खरा असल्याची शहानिशा करावी लागते. त्यासाठीही हे तज्ज्ञ त्यांची फि घेऊ शकतात.त्यामुळे मोठी रक्कम असेल आणि कोर्टात पुराव्याची गरज असेल तर हा पर्याय फायदेशीर ठरतो, असे ऍड.शितल शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.