प्रत्येकालाच आपलं घर फ्रेश असावं असं वाटतं. घर स्वच्छ, सुंदररीत्या सजवलेलं असेल तर त्या घरातील गृहिणीचे जास्त कौतुक होतं. पण, घर अस्वच्छ असेल तर मात्र पाहुण्यांच्यात पाणउतारा होतो. घरातील काही छोट्या गोष्टी साफ असणं अत्यंत आवश्यक आहे.
किचनमधील सिंक, ओव्हन, फरशी, या गोष्टी स्वच्छ असणं गरजेचच आहे. नाहीतर यामुळे अनेक आजार पसरतात. आणि पाहुणेही घर किती अस्वच्छ होतं, किती पसारा होता याची चर्चा करतात. तुम्हालाही असं तुमच्याबाबतील होऊ द्यायचं नसेल तर घर साफ करण्याच्या काही छोट्या हॅक्स आज जाणून घेऊयात.
लिंबाचा वापर करून घराला स्वच्छ आणि चकचकीत बनवू शकता. लिंबू तुमच्या घरातील धूळ, चिवट डाग घालवतो. एवढेच नाहीतर पाहुण्यांना घरात आल्यावर फ्रेश वाटण्यासाठीही तो मदत करतो. कसे ते पाहुयात.
लिंबू हा आंबट पदार्थ आहे. तो तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. लिंबूपासून बनलेले डिटॉक्स वॉटर तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते. हाच लिंबू तुमच्या किचन सिंकलाही चमकवतो. किचन सिंकमध्ये अडकलेले अन्न तिथेच राहून कुजते अन् त्यातून जंतू यायला सुरूवात होते.
त्याचा दुर्गंधही पसरतो. त्यामुळे लिंबूचा रस आणि मीठ घेऊन याने सिंक घासून घ्या. थोडावेळ तसेच ठेऊन नंतर भरपूर पाणी ओतून तो स्वच्छ करा. यामुळे जंतूही जातील आणि सिंकमधून येणारा दुर्गंधही नाहीसा होतो.
डस्टबिनमध्ये ओला, सुका कचरा एकत्रच साठवला जातो. पण तो डबा वेळेत रिकामा न केल्याने त्याचा दुर्गंध पसरतो. तुम्हाला या वासापासून सुटका करून घ्यायची असेल. तर, जेव्हा डस्टबिन धुवाल तेव्हा तो सुकायला ठेवण्याआधी त्यामध्ये लिंबूचा रस शिंपडा. डबा तसाच सुकू द्या आणि मग तो वापरायला घ्या. त्यामुले डस्टबिनमधील दुर्गंधी कमी होईल. (Kitchen Hacks)
मायक्रोव्हेवमधील चिवटपणा
तुम्ही मायक्रोव्हेव अनेकवेळा साफ केला असेल. त्यात असलेले सॉस, चिजचे डाग निघत नाहीत. त्यासाठी एका बाऊलमध्ये लिंबूचा रस, लिंबूच्या साली टाकून तो पाण्याने भरा. यानंतर हा बाऊल ओव्हनमध्ये ठेवा. लो पॉवरवरती पाच मिनिटचा टायमर सेट करून तसेच ठेऊ द्या. त्यानंतर ओव्हन आतून कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
बाथरूमचे नळ
घरातील नळातून स्वच्छ पाणी येत असले तरी नळ कधी स्वच्छ नसतात. कारण, साबणाचे, खरकटे हात, बेसीन अन् बाथरूमच्या नळाला लागतात. त्यामुळे त्यावर डाग पडतात. तुमच्या घराच्या नळांची चमक परत आणण्यासाठी तुम्ही लिंबाचा करा.
नळ स्वच्छ करण्यासाठी नळावर लिंबाची साल चोळा. काही वेळ चोळल्यानंतर ओल्या स्वच्छ कापडाने नळ पुसून टाका. हा प्रयोग केल्याने नळ नव्यासारखा दिसेल.
पावसामुळे विविध प्रकारचे किडे घरात शिरतात. या कीटकांमुळे रोग देखील होऊ शकतात. जर तुमच्या घरातही कीटक असतील, तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला महागड्या कीटक रिमूव्हर्सची गरज नाही. कीटक मारण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता. तुम्ही लिंबूपासून स्प्रे बनवू शकता-
स्प्रे तयार करण्यासाठी, स्प्रे बाटलीमध्ये समान प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी घाला.
आता या पाण्यात १-२ लिंबाचा रस पिळून घ्या.
दोन्ही गोष्टी नीट मिसळा.
कीटक मारण्यासाठी या स्प्रेचा वापर करा.
ओटा साफ केल्यानंतर हा स्प्रे माराल तर किटक जमा होणार नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.