Monsoon Skin Care: पावसाळ्यात लिंबाच्या रसाचा 'असा' करा वापर, काळे डाग अन् मुरुम होतील कमी

Monsoon Skin Care: चेहऱ्यावरचे डाग आणि मुरूम कमी करायचे असेल तर लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.
Monsoon Skin Care:
Monsoon Skin Care:Sakal
Updated on

Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचे संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्स असतात. यामुळे चोहऱ्याचे सौंदर्य खराब होते.पण लिंबाच्या रसाचा वापर करून या समस्येपासन सुटका मिळवू शकता. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. पण हा रस त्वेचेवर कसा वापरावा हे जाणून घेऊया.

कसा कराल वापर

रात्री झोपण्यापुर्वी कॉटन बॉलच्या मदतीने लिंबाचा रस थेट डागांवर लावावा आणि सकाळी पाण्याने धुवावा.

लिंबाच्या रसात मध मिक्स करून पेस्ट बनवावी आणि डाग, मुरीमावर लावावे

लिंबाच्या रसात गुलाबपाणी मिक्स करून लावू शकता. याचा वापर टोनरप्रमाणे करता येतो. चेहऱ्यावर स्प्रे करा आणि नंतर स्वच्छ धुवा.

तुम्ही दही, मुलतानी माती किंवा बेसणामध्ये लिंबाचा रस मिक्स करून फेस पॅक बनवू शकता. हे पॅक आंघोळीपुर्वी चेहऱ्यावर लावावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

Monsoon Skin Care:
Friendship Day 2024: 'या' भेटवस्तू तुमच्या मित्रांना ठेवतील दिर्घकाळ निरोगी अन् तंदुरूस्त

पुढील गोष्टींची घ्या काळजी

चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्यानंतर उन्हात जाणे टाळावे.सर्याच्या किरणांमुळे जळजळ होऊ शकते.

लिंबाचा रस त्वचेवर लावण्यापुर्वा पॅच टेस्ट करावी आणि मगच लावावे. त्वचा लाल किंवा जळजळ होत असेल तर लावू नका.

तुमच्या त्वचा कोरडी असेल तर लिंबाचा रस लावणे टाळा. कारण यामुळे त्वचा जास्त कोरडी पडू शकते. यामुळे मध मिक्स करून लावावे.

डोळ्यांच्या सभोवतालच्या नाजुक त्वचेसाठी लिंबाचा रस लावणे टाळावे.

लिंबाच्या रसाचे फायदे

लिंबाचा रस त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनचे उत्पादन कमी करतो. हे डाग हळूहळू कमी करतो.

लिंबाचा रस मुरुमांची समस्या निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढतो. हे त्वचेचे छिद्र स्वच्छ करते आणि अतिरिक्त तेल कमी करते.

लिंबाचा रस त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ करतो आणि चमक देतो.

लिंबाचा रस त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास देखील मदत करतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.