Lemongrass for Skin : चेहरा पिंपल्स, ऍलर्जीने भरलाय? गवती चहाने मिळेल उजळ त्वचा!

Face acne home remedies: खड्डे, मुरूम अन् बरंच काही... , गवती चहा या पद्धतीने वापरून पहा, फरक पडतो
Lemongrass for Skin
Lemongrass for Skinesakal
Updated on

Lemongrass for Skin Problems : लेममग्रासला आपल्याकडे गवती चहा म्हणतात. तो चहामध्ये टाकणे आणि एक अस्सल गावरान चवीचा चहा पिणे हेच आपलं काम. त्याचे उपयोग एवढेच आपल्याला माहिती आहेत. पण, यापुढे जाऊन गवती चहाचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल फासशी कोणाला माहिती नाही.

 खेडेगावातील प्रत्येकाच्या परस बागेत गवती चहा दिसतो. त्या झुडूपाच्या जवळून गेलं की त्याचा सुगंध दरवळतो. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे काही फायदे. 

 बरेच लोक चहामध्ये लेमनग्रास टाकून पितात. ते स्वयंपाकात एक घटक म्हणून देखील वापरले जाते, कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि संरक्षक गुणधर्म आहेत. लेमनग्रासचा वापर तुरटीसारखा देखील केला जातो. स्किनकेअर उत्पादनांमध्ये भरपूर त्याचा वापर केला जातो.

Lemongrass for Skin
Summer Skin Care : कड्याक्याच्या उन्हातही रिफ्रेशिंग चेहरा हवा असेल तर आजच करा हा सोपा उपाय

कसा ओळखायचा गवती चहा

लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा होय. हा एखाद्या गवताप्रमाणे दिसत असला तरी सामान्य गवतापेक्षा थोडा मोठा असतो. सामान्यतः गवती चहाचा वापर हा चहा बनवण्यासाठी आणि डासांपासून बचाव करण्यासाठी केला जातो.

गवती चहामधील गुणधर्म

गवती चहा घालून केलेला चहा प्यायल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तसेच घरात गवती चहाचे रोपटे लावल्याने डासांपासून बचाव करता येतो.

त्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल आणि फोलेट हे गुणधर्म असतात. ते विविध आजारांवर फायदेशीर आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गवती चहा घालून केलेला काढा आणि चहा यांचे सेवन केल्यास पचनसंस्था मजबूत होते.

 सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच ब्रेन पॉवरही वाढते. एवढेच नव्हे तर निद्रानाशाची समस्या असल्यास गवती चहाचा वापर करू शकतो. त्याच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येत लवकर आराम मिळतो.

Lemongrass for Skin
Lumpy Skin Disease : लंपी स्कीन पुणे जिल्ह्यात पुन्हा संशयित रुग्ण आढळले

गवती चहा अनेक प्रकारे फायदेशीर आहे. खरं तर, ही अशी गोष्ट आहे जी, लोक चहामध्ये आणि सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी वापरतात. पण, तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही या पानांचा अनेक प्रकारे वापर करू शकता.

चेहऱ्यासाठी लेमनग्रास कसा वापरायचा ?

गवती चहाचा लेप

लेमनग्रास बारीक करून चेहऱ्यावर लावणे तुमच्यासाठी क्लीन्सर म्हणून काम करू शकते, जे त्वचेचे छिद्र साफ करण्यासोबतच मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करू शकते. तर, यासाठी लेमनग्रास बारीक करून त्यात थोडा कोरफड घाला आणि चेहऱ्यावर लावा. अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

गवती चहाच्या पाण्याने चेहरा धुवा

गवती चहाच्या पाण्याने चेहरा धुणे तुमच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. हे पाणी मुरुमांच्या जीवाणूंना मुळातूनच उपटून टाकते. ते मुरुमांचा प्रसार होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

याशिवाय चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासही हे उपयुक्त आहे. त्यामुळे लेमनग्रास घ्या, पाण्यात उकळून घ्या आणि या पाण्याने चेहरा धुवा.

वजन कमी करण्यासाठी

चयापचय गतिमान होण्यासोबतच पोट स्वच्छ त्वचेसाठी लेमनग्रास वापरण्याचा सर्वात मोठा फायदा होतो. चेहऱ्यावर गोठलेले. घाण साफ करते. दुसरे, ते तुमच्या त्वचेतील मुरुमांचे बॅक्टेरिया नष्ट करते आणि त्वचेतील रक्ताभिसरण गतिमान करते. अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत होते. तर, या सर्व कारणांसाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी लेमनग्रास वापरावे.

Lemongrass for Skin
Skin Care : स्क्रबिंग किती वेळ करावं हेसुद्धा माहिती असणं गरजेचं? नाहीतर चेहरा...

गवती चहाचे इतर फायदे

  • सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.

  • पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.

  • थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

  • जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.

  • डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.

  • गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.

  • शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.