Life Lesson : माणसाने लोभापासून मुक्त कसं व्हावं?, प्रेमानंद महाराजांनी दिलं सुंदर उदाहरण

प्रेमानंद महाराजांच्या मते जीवनात तीन गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला भगवंताची प्राप्ती होऊ देत नाहीत.
Life Lesson
Life Lessonesakal
Updated on

Life Lesson :

माणसाचे सर्वात मोठे शत्रू हे त्याच्या स्वभावातच दडलेले आहेत. लोभ, मोह, मत्सर, क्रोध, काम हे मानवी मनाचे महत्त्वाचे शत्रू आहेत. हे गूणच आपला घात करतात. त्यातही एखाद्या गोष्टीचा लोभ करणं, त्या गोष्टीला मिळवण्यासाठी लोक वाईट कृत्य करायला लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर अन् त्यांच्याशी संबंधित व्यक्तीवर होतो.

आजकाल खून, दरोडे, चोऱ्या होतात ते काहीतरी मिळवण्यासाठीच. कारण, माणूस पैसा, प्रेम, संपत्ती मिळवण्यासाठी एकमेकांच्या जीवाचीही पर्वा करत नाही. त्यामुळेच, लोक अडचणीत येतात. हा लोभ कसा सोडवायचा याबद्दल अनेक उपदेश तुम्ही ऐकले असतील.  (Life Lesson)    

Life Lesson
Life Lesson : तुम्ही स्वत:मध्ये कराल 'हे' बदल तर नक्कीच फायदा होईल, गौर गोपाल दास यांचा मोलाचा सल्ला

याबद्दल प्रेमानंद महाराज यांनी काही उपदेश केले आहेत. जे तुम्हाला तुमच्या स्वभावातून लोभ, लालसा कमी करण्यास मदत करतील.

जो पैशाच्या लोभाचा फास आपल्या गळ्यात अडकू देत नाही तो एकतर देव आहे किंवा तो भगवंताला प्राप्त झालेला महापुरुष आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते जीवनात तीन गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला भगवंताची प्राप्ती होऊ देत नाहीत.

या ३ गोष्टी म्हणजे कांचन, कामिनी आणि कीर्ती. यामध्ये कांचन म्हणजे केवळ संपत्ती. प्रेमानंद महाराजांनी कांचन, कामिनी आणि कीर्ती या माणसाच्या जीवनातील अशा तीन दरींचे वर्णन केले आहे जे त्याच्या ईश्वरप्राप्तीच्या मार्गातील अडथळे आहेत. (Positive Life)

Life Lesson
Life Imprisonment: 40 वर्षांपूर्वी आंब्यासाठी झाले होते भांडण, सुप्रीम कोर्टाने आता का कमी केली जन्मठेपेची शिक्षा?

मनुष्य इंद्रियांवर खर्च करण्यासाठी पैसा वापरतो. प्रेमानंद यांनी राजा ययातीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की शुक्राचार्य यांची कन्या देवयानी जी खूप सुंदर होती. ययाती आणि तिचे लग्न झाले. ययातीने ऐषारामाचा उपभोग घेतला. पण जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याने पुन्हा आपल्या मुलाच्या तारुण्याच्या ऐषोआरामाचा आनंद लुटला. मात्र शेवटपर्यंत त्याला काहीही सापडले नाही.

Life Lesson
Healthy Life: उभारू गुढी आरोग्याची...! निरोगी अन् तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

मग ते म्हणाले की, भगवंतापासून दुरावलेल्या माणसाला सर्व ऐहिक सुख-सुविधा दिल्या तरी अशा लोकांना कधीच मोक्ष मिळत नाही. थोर महात्म्यांनी ते पाहिले. सुखातून कधीच शांती मिळत नाही पण ज्यांनी जीवनात सुख सोडले त्यांनाच समाधान मिळते. (Successful Life)

अशा स्थितीत प्रेमानंद महाराज म्हणतात की, माणसाने सुख-विलासात रस न ठेवता आपले सर्व लक्ष भगवंतावर केंद्रित केले आणि ते योग्य ठिकाणी केंद्रित केले तर त्याला या जगात आणि त्या जगातही समाधान मिळेल.

जेव्हा भगवंतापासून लक्ष विचलित होते, तेव्हा ही फसवी माया माणसाला आयुष्यभर अडकवून ठेवते आणि त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते,असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.