Lifeskill Tips : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग 'या' 5 वाईट सवयी आताच सोडा

श्रीमंत सगळ्यांनाच व्हायचं असतं पण अडचण नेमकी काय येते तेच समजत नाही.
Lifeskill Tips
Lifeskill Tipsesakal
Updated on

Avoid These 5 Habits To Become Rich : प्रत्येक माणसालाच श्रीमंत होण्याची इच्छा असते. त्यासाठी तो काबाड कष्ट करत असतो. पण म्हणावं तसं यश मिळत नाही. पण जे लोक श्रीमंत होतात त्यांच्यात असं काय खास आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? त्यांच्यात अशा कोणत्या सवयी आहेत किंवा नाहीत ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात.

त्यामुळे जर तुम्हालाही श्रीमंत बनायचं असेल तर आम्ही आज तुम्हाला अशा ५ सवयी सांगत आहोत ज्या तुम्ही आजच सोडायला हव्या.

कोणत्या आहेत त्या ५ सवयी

कामचुकारपणा करणे

आपण आजूबाजूला असे अनेक लोक बघतो जे सतत काम टाळत राहतात. जर कोणते काम दिले तर ते करून मोकळे होण्यापेक्षा पुढे पुढे ढकलत राहतात. याउलट जेवढेही श्रीमंत लोक असतात ते सगळ्यात आधी आपली टू डू लिस्ट बनवतात. यात सर्व आवश्यक कामांच्या नोंदी असतात. जोवर ती कामं पुर्ण होत नाहीत तोवर ते दुसऱ्या कामांना हात लावत नाहीत.

Lifeskill Tips
Personality Tips : तुमचा Confidence कमी झालाय असं वाटतंय का? मग या ७ टिप्स खास तुमच्यासाठी

कोणी बोलताना मध्ये बोलू नये

कम्युनिकेशन स्किल्सचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणे. आपण जेव्हाही कोणत्या डिस्कशनमध्ये असतो तेव्हा दुसऱ्याचं ऐकून घेण्यापेक्षा आपल्याला कधी बोलायला मिळतं याची वाट पाहत राहतो. जर तुम्ही दुसऱ्यांना ऐकून घेण्याची सवय विकसीत केली तर यशस्वी होण्याची शक्यता वाढते. सगळे यशस्वी लोक दुसऱ्यांना ऐकून घेणं पसंत करतात. आणि दुसरं कोणी बोलत असेल तेव्हा मध्ये बोलत नाही.

स्वतःची चूक न स्वीकारणे

चुका सगळ्यांकडू होतात. पण फरक ती चुक स्वीकारल्यानंतर पडतो. सामान्य लोक जेव्हाही काही चुक करतात तेव्हा त्यासाठी कायम दुसऱ्यांना जबाबदार ठरवतात. या उलट जेवढेही श्रीमंत आणि यशस्वी लोक असतात ते फक्त स्वतः चुक स्वीकारतच नाहीत तर त्यातून शिकण्याचाही प्रयत्न करतात.

Lifeskill Tips
Relationship Tips : रुसलेल्या जोडीदाराची समजूत कशी काढायची ?

जबाबदारीपासून पळ काढणे

सामान्यतः जेव्हा कोणाला जबाबदारी दिली जाते ती त्यांच्याकडून पुर्ण होऊ शकली नाही तर ते त्यासाठी अनेक बहाणे बनवू लागतात. पण यशस्वी लोकं कधीही आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत नाहीत. त्यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतात.

ध्येय स्पष्ट नसणे

कोणत्याही माणसाच्या आयुष्यात ध्येय स्पष्ट असणे आवश्यक असतं. जेवढेही श्रीमंत आणि यशस्वी लोकं असतात ते कायम आपले ध्येय ठरवून काम करत असतात. जोवर आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे माहित नसेल तोवर आपण पुढे जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.