Drink Water ही आहे पाणी पिण्याची योग्य वेळ, चुकीच्या वेळी पाणी प्याल तर होईल नुकसान

पाणी पित असतानाही काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यानेच शरीराला त्याचे फायदे होवू शकतात
पाणी पिण्याच्या योग्य वेळा
पाणी पिण्याच्या योग्य वेळाEsakal
Updated on

शरीर हायड्रेट Hydrate ठेवण्यासोबत इतर अनेक कारणांसाठी भरपूर पाणी पिणं Drinking Water गरजेचं असल्याचं आपण कायमच ऐकलं आहे. मानवी शरीरात ७० टक्के पाणी असल्याने ही पाण्याची पातळी राखली जाणं महत्त्वाचे आहे. Lifestyle and Health Marathi Tips what are the right time for water intake daily

तसंच शरीराचं कार्य सुरळीत चालावं यासाठी पाणी पिणं Water Intake अत्यंत गरजेचं आहे. पाणी हे शरीरासाठी गरजेचं असलं तरी चुकीच्या वेळी पाणी प्यायल्याने शरीराला Human Body त्याचं नुकसानही होऊ शकतं.

यासाठीच पाणी पित Drinking Water असतानाही काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यानेच शरीराला त्याचे फायदे होवू शकतात.

पाणी पिण्याची चुकीची वेळ

नाश्ता करताना किंवा जेवताना जास्त पाणी पिणं, तसंच नाश्ता Breakfast किंवा जेवणानंतर लगेचच पाणी पिणं हे आरोग्यासाठी नुकासानदायक ठरू शकतं. जेवणादरम्यान सतत पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचनावर होतो.

तज्ज्ञांच्या मते जेवत असताना जास्त पाणी प्यायल्याने फॅट्स वाढू शकतात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

जेवताना किंवा नाश्ता करताना सतत पाणी प्यायल्याने इन्श्युलिनची पातळी वाढू लागते यामुळे शरीरामध्ये फॅट्स जमा होवू लागतात.

हे देखिल वाचा-

पाणी पिण्याच्या योग्य वेळा
Drinking Warm Water Benefits : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये

शरीर हायड्रेट रहावं यासाठी दिवसा पाणी पिणं कधीही योग्य. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने त्याचा किडनीवर परिणाम होवू शकतो. तसंच रात्री पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावं लागल्याने त्याचा परिणाम झोपेवर होवू शकतो.

तहान लागल्यावरच पाणी प्या

कमी पाणी पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं हे देखील शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तहान लागली नसतानाही सतत पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन आणि वॉटर इनॉक्सिनेशनची समस्या निर्माण होवू शकते. तसंच गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण कमी होवू शकतं.

घाईत किंवा पटापटा पाणी पिणं

घाईत किंवा पटापटा पाणी प्यायल्याने त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे अपचन आणि गॅसची समस्या निर्माण होवू शकते. तसचं जलद पाणी प्यायल्याने मूत्राशय आणि किडनीवरही परिणाम होवू शकतो. यासाठीच नेहमी हळू हळू एक एक घोट पाणी प्यावं.

उभ्याने पाणी पिणं

असे अनेकजण असतात ज्यांना दिवसभरात अनेकवेळा उभ्याने पाणी पिण्याची सवय असते. मात्र उभ्याने पाणी प्यायल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. उभ्याने पाणी प्यायल्याने त्याचा शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो. यासाठी शक्य तेव्हा बसूनच पाणी प्यावं.

हे देखिल वाचा-

पाणी पिण्याच्या योग्य वेळा
Drinking Water With Meals : जेवताना पाणी पिणे चूक की बरोबर? काय म्हणतात तज्ज्ञ

पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

-दिवसभरामध्ये तहान लागल्यावर वेळोवेळी पाणी पिणं कधीही योग्य

- खास करून सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्यायल्यास शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.

- तसंच जेवणाच्या २० मिनटं आधी तुम्ही पाणी पिऊ शकता. तसंच जेवल्यानंतरही अर्धा ते पाऊण तासांनी पाणी प्या.

- वर्कआउट सुरू करण्यापूर्वी तसंच वर्कआउट दरम्यान आणि वर्कआउट झाल्यावर तुम्ही पाणी पिऊ शकता.

- झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्या.

- बाहेरून आल्यानंतर लगेचच पटापटा पाणी पिऊ नका तर काही मिनिटं बसून मग हळू हळू पाणी प्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.