Hair Transplant Techniques: तरुणपणातच Young Age जास्त प्रमाणात केस गळल्याने केस विरळं होणं किंवा टक्कल पडणं Baldness ही आता सामान्य समस्या बनली आहे. बदललेली जीवनशैली आणि अनेकदा अनुवांशिक कारणांमुळे अकाली टक्कल पडू शकतं. Lifestyle Marathi News Know About Hair Transplant Techniques
केस गळती Hair Fall थांबवण्यासाठी काही उपाय करणं शक्य आहे. मात्र एकदा टक्कल पडलं तर पूर्वी प्रमाणे दाट केस येण्याची शक्यता जवळपास शून्य असते. यासाठीच गेल्या काही वर्षात हेअर ट्रान्सप्लांट Hair Transplant ही थेरपी प्रचलित झाली आहे.
गेल्या दशकभरात अनेकजण अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहेत. एकेकाळी केवळ सेलिब्रिटी हेअर ट्रान्सप्लांट करून घेत. मात्र हेअर ट्रान्सप्लांटसाठी आधुनिक पद्धती आल्याने त्याही कमी खर्चात होत असल्याने अनेकजण हेअर ट्रान्सप्लांट करून आपलं सौदर्य जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेअर ट्रान्सप्लांटच्या कोणकोणत्या टेक्निक आहेत. कोणत्या स्थितीमध्ये कोणती टेक्निक वापरली जाते. तसचं हेअर ट्रान्सप्लांट बद्दलचे काही समसज गैरसमज हे या लेखातून तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
हे देखिल वाचा-
कसं होतं हेअर ट्रान्सप्लांट
हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी खोट किंवा इतर व्यक्तीचे केस न वापरता संबंधित व्यक्तीच्याच केसाचा वापर केला जातो.
नवं तंत्रज्ञान आणि कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने व्यक्तीच्या डोक्याच्या मागील भागातील काही केस मुळापासून काढले जातात आणि ते टक्कल असलेल्या ठिकाणी लावले जातात. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कमी केस असतील तर ट्रान्सप्लांटसाठी दाढीचे किंवा छातीवरील केस वापरले जातात.
हेअर ट्रान्सप्लांटच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी ८-१० आठवडे लागू शकतात. या केसांची इतर केसांप्रमाणेच वाढही होते. तुम्ही या केसांचा हेअर कटही करू शकता. तसंच हे केस पुन्हा गळत नाहीत. त्यामुळे तुमची केस गळतीची चिंता कायमची सुटू शकते.
हेअर ट्रान्सप्लांटसाठी आठवड्यातून एकदा ५-६ तासांच्या सर्जरीचं एक सेशन असतं. एकावेळी डोक्यावरील काही भागातच केस ट्रान्सप्लांट केले जातात.
या सर्जरी दरम्यान एनेस्थिसिया देणारे डॉक्टर इतर आधुनिक उपकरणं हाताळणारे तज्ञ तसचं कॉस्मेटीक सर्जन अशी डॉक्टरांची टीम असते. हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी व्यक्तीच्या आजारांबद्दल किंवा एलर्जीबद्दल माहिती घेतली जाते.
हेअर ट्रान्सप्लांटसाठी दोन टेक्निक किंवा पद्धती वापरल्या जातात. या टेक्निकबद्दल जाणून घेऊयात
हे देखिल वाचा-
FUT (स्ट्रिप प्रक्रिया)- यापद्धतीमध्ये किंवा टेक्निकमध्ये व्यक्तीचं टक्कल पडण्यामागचं कारण जाणून घेतलं जातं. त्यानंतर टक्कल पडलेल्या भागाचं तसचं ज्या भागातून केस घ्यायचे आहेत म्हणजेच डोनर एरियाचं परिक्षण केलं जातं.
सर्जरी दरम्यान डोनर भागातून केसांची एक मोठी स्ट्रिप काढली जाते. ही स्ट्रिप टाके घालून टक्कल पडलेल्या भागामध्ये बसवली जाते. तसचं इंप्लांट केलेल्या ठिकाणी बॅण्डेडने कव्हर केलं जातं. एक दिवसाने ही पट्टी काढली जाते. तसचं डोनर भागातही काही विरघळणारे टाके घातले जातात.
मात्र ही प्रक्रिया करण्यासाठी काही मर्यादा येत असल्याने अनेक जण या प्रक्रियेएवजी दुसरा पर्याय निवडतात. कारण या प्रक्रियेत जास्त टक्कल असेल तर तो भाग कव्हर करणं शक्य होतं नाही.
कारण या प्रक्रियेत दाढी किंवा छातीवरील केसांचा वापर करणं शक्य नसतं. तसचं डोनर भागातील केस काढल्याने तिथे केस काढल्याची हलकी लाईन दिसू शकते. काही वेळेस ही प्रक्रिया वेदनादायी ठरू शकते.
FUE हेयरलाइन ग्राफ्टिंग (फॉलिकल प्रक्रिया)- हेअर ट्रान्सप्लांटचा हा उत्तम पर्याय आहे. अनेकजण हा पर्याय निवडणं पसंत करतात. अनेकदा कपाळाच्यावर पुढील बाजुने टक्कल असेल तर स्ट्रीप टेक्निक वापरता येत नाही. अशावेळी फॉलिकल हेअर हेअर ट्रान्सप्लांट पर्याय वापरला जातो.
यामध्ये डोक्या मागील भागातील किंवा दाढी तसचं छातीचे केस वापरता येतात. या प्रक्रियेत एक एक केस ग्राफ्ट केला जातो. या प्रक्रियेचा फायदा म्हणजे यात टाके घातले जात नसल्याने व्रण राहण्याची चिंता नसते. तसंच यात वेदना होत नाहीत.
ही सर्जरी करताना व्यक्तीला बेशुद्ध केलं जातं. साधारणं सात ते आठ तास ही सर्जरी चालते. मायक्रोनिडलच्या मदतीने केसांचं प्रत्योरोपण केलं जातं. काही वेळेस मॅन्युअली ही प्रक्रिया केली जाते तर अनेक क्लिनिकमध्ये मोटर आधारित सर्जिकल टूलच्या मदतीने ट्रान्सप्लांट केलं जातं.
अशा प्रकारे आता टक्कल पडलं असेल तरी हेअर ट्रान्सप्लांट हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हेअर ट्रान्सप्लांटसाठी साधारणं ५०-६० हजार खर्च येऊ शकतो. अर्थात तुमचं टक्कल किती पडलं आहे. यावर हा खर्च कमी किंवा जास्त असू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.