Lift Safety : लिफ्टमध्ये अडकलात तर पॅनिक होऊ नका, शांत रहा अन् इतकंच करा

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे
Lift Safety
Lift Safety esakal
Updated on

Elevator :शहरांमध्ये अनेक उंच इमारती आणि उंच अपार्टमेंट्स आहेत, त्यामुळे त्यामध्ये लिफ्टचा वापर खूप जास्त आहे. ही आज गरज बनली आहे, कारण वेगवेगळ्या गंतव्यस्थानांवर पोहोचणे सोपे झाले आहे. लिफ्टला नेहमी देखभालीची आवश्यकता असते.

जर त्याची योग्य देखभाल केली नाही तर ती खराब होऊ शकते. लिफ्टमध्ये अडचण आल्याने ती अचानक बंद पडू शकते. जर तुम्ही लिफ्टमध्ये अडकलात तर तो एक भयानक अनुभव असू शकतो.

लखनऊच्या एका अपार्टमेंटमध्ये एक मुलगी लिफ्टमध्ये अडकली. यानंतर जेव्हा ती बाहेर पडू शकली नाही तेव्हा ती ढसाढसा रडू लागली आणि बचावाची याचना करू लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Lift Safety
Mumbai Lift Collapsed : विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, एक ठार; काही कामगार अडकले

मात्र, नंतर लिफ्ट सुरू झाल्यावर ती तळघरात पोहोचली. थरारक अनुभव घेऊन ती मुलगी लिफ्टमधून सुखरूप बाहेर आली. तुम्हीही असे अडकला असाल तर काय करावं? ही कठीण परिस्थिती कशी हाताळावी,याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात.

लिफ्टमध्ये अडकल्यास काय करावे?

मन शांत ठेवा

लिफ्ट अचानक बंद पडली तर अजिबात घाबरू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घाबरण्याऐवजी, शांत राहणे आपल्याला योग्य दिशेने पावले उचलण्यास मदत करू शकते.

Lift Safety
Lift Safety Tips : लिफ्टमध्ये अडकला तर घाबरू नका; 'या' टिप्स वापरून सुरक्षितपणे बाहेर येऊ शकाल

मोबाईलचा वापर करा

लिफ्टमध्ये नेटवर्क असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा सिक्युरिटी गार्डला फोन करून लिफ्ट बंद असल्याची माहिती द्या. याच्या मदतीने तुमची लवकर सुटका होऊ शकते.

इंटरकॉम किंवा आपत्कालीन बटण वापरा

लिफ्टमध्ये सहसा इंटरकॉम किंवा आणीबाणी बटण असते. जर मोबाईल काम करत नसेल तर बटण दाबा किंवा इंटरकॉम गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.

Lift Safety
Jalgaon News : दुचाकीची Lift घेणे बेतले वृद्धेच्या जिवावर

वाट पहा

परिस्थिती आपल्या हाताबाहेर असली की आपण फक्त वाट पहायची. हे वाक्य इथेही लागू पडतं. तुम्ही लिफ्टमध्ये अडकला असाल तर लिफ्ट सुरू होण्याची वाट पहा.

पंखा चालू करा

लिफ्टमध्ये फारकाळ राहीलं की गुदमरल्या सारखं वाटतं. त्यामुळं लिफ्टमध्ये असलेले ओव्हरहेड पंखे लावले जातात. ते चालू केले तर हवा येत राहील आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही.

लिफ्टचे दार वाजवा

जर कोणतेच उपाय काम करत नसतील, तर हळूवारपणे दरवाजा ठोठावा जेणेकरून बाहेरील कोणीतरी तुम्हाला मदत करू शकेल. तसेच आवाज द्या, ज्यामुळे लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.