उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडते. त्वचेसोबतच ओठांवरही उन्हाची लक्षणे दिसू लागतात. उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची कमतरता भासली कि शरीर डिहायड्रेट व्हायला सुरू होते. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर त्वचेवर दिसू लागतो.
उन्हाळ्यात सर्वाधिक विवाह सोहळे पार पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते. पण मेकअप सेट झाला तरी लिपस्टिक मात्र सेट होत नाही. कारण ओठ फाटलेले अन् कोरडे पडलेले असतात. (Lips Care)
ओठांवर लावण्यासाठी क्रिम्सचा वापरही केला जातो. मात्र, सतत क्रिम लावून ओठ तात्पुरते मऊ होतात. संपूर्ण उन्हाळा तुम्हाला ओठ मऊ ठेवायचे असतील तर संत्री तुम्हाला मदत करेल.
संत्रीच्या सालीचा स्क्रब
संत्र्याच्या सालीचा लिप स्क्रब बनवण्यासाठी खोबरेल तेल, साखर, मध आणि संत्र्याची साल लागते. लिप स्क्रब बनवण्यासाठी प्रथम संत्र्याची साले उन्हात वाळवावी. यानंतर ही साले बारीक करून घ्या.
या पावडरमध्ये साखर मिसळा. या मिश्रणात खोबरेल तेल आणि मध घालून पेस्ट बनवा. यानंतर या मिश्रणाने ओठांना स्क्रब करा. 20 ते 30 सेकंद स्क्रब केल्यानंतर कोमट पाण्याने ओठ धुवा. स्क्रब केल्यानंतर ओठांवर खोबरेल तेल लावा. (Face Care Tips)
संत्र्याची साल
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. व्हिटॅमिन सी वापरल्याने हायपर-पिग्मेंटेशनपासून मुक्त होण्यास मदत होते. घरगुती संत्र्याच्या सालीचा स्क्रब वापरल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. स्क्रबिंग ओठांना हायड्रेट ठेवते, ज्यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी राहतात.
खोबरेल तेल
खोबरेल तेल लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होतो. खोबरेल तेल लावल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होतो. ओठांची नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी नारळाचे तेल खूप चांगले आहे. खोबरेल तेल लावल्याने ओठांना हायड्रेट राहते, ज्यामुळे फुटलेले कोरडे ओठ बरे होण्यास मदत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.