Lipstick History
Lipstick History esakal

Lipstick History : किड्यांपासून तयार झाली अन् संसदेतही गाजली; असा आहे लिपस्टीकचा इतिहास!

महिलांच्या मेकअप ज्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अशा या लिपस्टीकला हजारो वर्षांचा इतिहास आहे
Published on

पिंक लिप्स, तेरे होट गुलाबी ही अशी गाणी महिलांची सर्वात आवडती वस्तू लिपस्टीकला समर्पित आहेत. महिलांच्या मेकअप ज्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अशा या लिपस्टीकला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आजकाल १० रूपयांपासून कोटींच्या किंमतीत लिपस्टीक बाजारात उपलब्ध आहेत. एच कॉचर ब्युटी डायमंड या कंपनीची लिपस्टीक तर ९३ कोटी रूपयाला मिळत आहे.

अशा काळात अगदी किरकोळ वाटणारी लिपस्टीकही कोट्यावधीच्या घरात आहे. त्यामूळे लिपस्टीकचा इतिहासही जाणून घेणे गरजेचे आहे. कोणत्या काळातील महिलांनी याचा प्रथम वापर केला. या सर्वाबद्दल जाणून घेऊयात.

5000 वर्षांपूर्वी सुमेरियन पुरुष आणि स्त्रिया ज्या प्रकारची लिपस्टिक वापरत होते. ती वापरणे आज शक्य नाही. असे म्हणतात की सुमेरियन लोक मौल्यवान रत्ने बारीक करून ओठांवर लावायचे. याशिवाय फळे, पाने दळून ओठांची सजावट केली जात होती. सिंधू संस्कृतीच्या काळात, प्स्त्रिया लिपस्टिक म्हणून गेरूचे आयताकृती तुकडे वापरत. महर्षी वात्स्यायन यांनी रचलेले कामसूत्र, भारतातील प्राचीन ग्रंथ, लाल लाखे आणि मेणापासून बनवलेले ओठ वापरण्याच्या आणि रंगवण्याच्या पद्धतीचे वर्णन त्या पुस्तकात आहेत.

ताम्र युगातील स्त्री व पुरुष यांनी चेहऱ्यावरील शोभा वाढण्याची सुरुवात सुमारे 5000 वर्षांपूर्वी केली. ते काही रंगीत दगडाची पावडर करून डोळ्यांच्या भोवती व ओठांवर त्याचा लेप लावत असायचे.

Lipstick History
Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी; पोस्ट व्हायरल

सिंधू संस्कृतीतील स्त्रियांनी गेरूचा वापर ओठ रंगवण्यासाठी करायला सुरुवात केली. गेरू हा पदार्थ हलका पिवळसर आणि गडद तपकिरी या रंगात असतो. आजही आफ्रिकेतील काही आदिवासी जमाती गेरूचा वापर शरिरावर नक्षीकामासाठी करतात.

दुसरीकडे, इजिप्तबद्दल असे म्हटले जाते की तिथल्या स्त्रिया क्लियोपेट्रा नावाचे कीडे मारून आपले ओठ लाल रंगात सजवत असत. इजिप्शियन लोकांना वास्तविक लिपस्टिक प्रेमी मानले जात असे. त्यांच्यामध्ये जांभळा आणि काळा रंग सर्रास वापरला जात होता. रंगांसाठी, त्याने कोचीनियल कीटकांपासून काढलेल्या कार्माइन डाईचा वापर केला. खरं तर, कार्माइन डाई अजूनही लिपस्टिक आणि इतर उत्पादनांमध्ये वापरली जाते.

Lipstick History
Gold-Silver Rate : आज सोन्याच्या दरात झाली वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

सिंधू संस्कृतीतील स्त्रिया लिपस्टिक म्हणून गेरूचा वापर करत. असेही सांगितले जाते की त्या काळात लिपस्टिक प्रत्येकासाठी नव्हती. परंतु केवळ इजिप्तमधील शक्तिशाली आणि श्रीमंत महिलाच दररोज लिपस्टिक वापरत असत.

प्राचीन ग्रीस मध्ये ओठ रंगवण्याची मुभा केवळ वेश्यांना होती. पुढे ते उच्च वर्गीयांच्या वापरात येऊ लागले. ग्रीक स्त्रिया मलबेरी नावाची फळं चुरून, तसेच लाल पाऱ्याचा वापर करत होत्या. काही समुद्री जीवांच्या उत्सर्जनातून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून ओठावर लावण्यायाठी रंग बनवत असत.

Lipstick History
Pune Crime: पुण्यात बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आतापासून 1000 वर्षांपूर्वी चिनी लोकांनी मेणापासून लिपस्टिक बनवायला सुरुवात केली. ओठाच्या त्वचेला संरक्षण म्हणून ते लिपस्टिक चा वापर करू लागले. त्यात सुगांधी तेल समाविष्ट केले गेले. 16 व्या शतकात राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या काळात ओठांवर लाल रंगाचा मेण आणि लाल वनस्पती रंग मिसळून बनवलेली लिपस्टिक वापरण्यास सुरूवात झाली. तेव्हा इंग्लंडमध्ये लिपस्टिकची लोकप्रियता वाढली. मेण आणि फुले यांचे मिश्रण करून हा लाल रंग तयार करण्यात आला होता.

19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने वापरणे वाईट मानले जात असे. 1884 मध्ये परफ्यूमर्स नावाच्या फ्रेंच कंपनीने पॅरिसमध्ये पहिल्यांदा लिपस्टिक बनवण्यास सुरुवात केली. 1890 मध्ये अमेरिकेत कार्माईन  नावाचा गडद लाल पदार्थ मेनासोबत वापरून लिपस्टीक बनवली गेली. 1940 मध्ये रसायन शास्त्रज्ञ हेझल बिशप यांनी पहिली जास्त काळ टिकणारी लिपस्टिक बनवली. त्यांनी लाल रंगा व्यतिरिक्त इतरही रंगात लिपस्टिक बनवायला सुरुवात केली.

Lipstick History
Tunisha Sharma Death: तुनिषाला दहा दिवसांपूर्वीच आला होता एंजायटी अटॅक..हतबल होत आईला म्हणाली होती...

नवव्या शतकात अबुल कासिम अल-जहरावी नावाचा एक प्रसिद्ध हकीम होता, त्यांना जगातील पहिले सर्जन म्हणूनही ओळखले जाते. कदाचित त्यामुळेच त्यांना आधुनिक शस्त्रक्रियेचे जनक देखील म्हटले जाते. अबुल कासिम अल-जहरावी यांनी अशा 200 हून अधिक सर्जिकल उपकरणांचा शोध लावला. जी उपकरणे आजही वापरली जातात.

अबुल कासिम अल-जहरावी यांनी सॉलिड लिपस्टिकचा शोध लावला. त्यांनी सुरुवातीला परफ्यूम लावण्यासाठी एक स्टॉक बनवला जो नंतर मोल्डमध्ये दाबला जाऊ शकतो. त्याने हीच पद्धत रंगांसह वापरून पाहिली आणि नेहमी वापरता येईल अशा लिपस्टिकचा शोध लावला. मेणाच्या लिपस्टिकचा वापर चीनमध्ये 1000 वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे मानले जाते. ओठांच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यासाठी चिनी लोक मेणापासून बनवलेली लिपस्टिक बनवतात.

लिपस्टिक लावण्याबाबत प्रत्येक ठिकाणी नवा ट्रेंड होता. असे म्हटले जाते की जपानमधील स्त्रिया हेवी मेकअप आणि डार्क लिपस्टिक वापरत असत जी टार आणि बीबॅक्सपासून बनलेली होती.

असं म्हणतात की १९व्या शतकाच्या उत्तरार्धात गेर्ले या फ्रेंच कंपनीने मोठ्या प्रमाणावर लिपस्टिक बनवण्याची जबाबदारी पहिल्यांदा उचलली. ही एक परफ्यूम कंपनी होती, जी नंतर व्यावसायिकरित्या लिपस्टिक तयार करणारी पहिली कंपनी बनली. असे म्हटले जाते की तिची लिपस्टिक हरणाची चरबी, मेण आणि एरंडेल तेलाने बनविली गेली होती जी नंतर रेशमाच्या कागदात गुंडाळली गेली. 1920 च्या दशकापर्यंत, लिपस्टिकने महिलांच्या जीवनात कायमचे स्थान बनवले होते.

ग्रेस केली, मर्लिन मनरो, ऑड्रे हेपबर्न आणि एलिझाबेथ टेलर सारख्या हॉलिवूड ग्लॅम आयकॉन्सना जगभरात लिपस्टिक ट्रेंडला प्रोत्साहन देण्याचे श्रेय जाते. 1950 च्या एका सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला होता की, 60 टक्के किशोरवयीन मुली लिपस्टिक लावतात.

संसदेतही गाजली लिपस्टीक

एक काळ असा होता की ब्रिटीश संसदेत लिपस्टिकबाबत विधेयक मांडण्यात आले होते. या विधेयकात सुचविलेल्या तरतुदीनुसार, जर एखाद्या मुलीने लग्नापूर्वी लिपस्टिक वापरली असेल. तर तिचा विवाह रद्द करण्यात यावा. मात्र, हे विधेयक निरर्थक समजून ते मंजूर करण्यात आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.