Home Decoration Ideas: रूम डेकोरेशनच्या अनेक आयडिया आपण Google वर, YouTube वरती बघत असतो, अनेकांना आपण राहत असलेली खोली सजवण्याची खूप इच्छा असते, पण नोकरीसाठी, शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या आणि PG मध्ये किंवा रेंटने राहणाऱ्या लोकांना हे शक्य होत नाही.
अनेकदा PG मध्ये असं करायला परवानगी देत नाही आणि उगाच पैसे खर्च करून रंग देणं परवडतही नाही, यालाच पर्याय म्हणून तुम्ही या टेंटेटिव्ह आयडिया वापरू शकतात. गंमत म्हणजे या डेकोरेशन केलेल्या वस्तू तुम्ही घर बदललं तरी सोबत नेऊन दुसरीकडे लावू शकतात.
१. वॉल हँगिंग
खिळे ठोकून तिथे मोठे मोठे हँगिंग लावणं शक्य नसतं अशात तुम्ही प्लॅस्टिकचे डिस्पोझेबल आणि लोकरीचे धागे वापरुन असे वॉल हँगिंग करू शकतात. अगदीच १०० रुपयात हे वॉल हँगिंग तयार होईल, शिवाय आपल्या खोलीच्या खिडकीत किंवा बाल्कनीत हे सुंदर हँगिंग तुम्ही लावू शकतात.
२. वेल्कम डोअर प्लेट
अर्थात दुसऱ्याच्या घरावर आपण आपली नेमप्लेट लावू शकत नाही पण तुम्ही आइसक्रीमच्या काड्या किंवा कार्डबोर्डच्या मदतीने एक प्लेट बनवून त्यावर एक छान कोट लिहू शकतात. जसं की “Welcome to our little nest” किंवा “इथे सगळे स्वप्नाळू लोकं राहतात” किंवा “आळशी असणं एक कला आहे”
३. वॉलपीस
वॉलपीससाठी खूप आयडीया तुम्हाला मिळतील जसं की DVD पासून छान वॉलपीस बनवणे किंवा मायक्रमच्या किंवा पेपर क्विलिंगच्या आयडीया किंवा एवढं काही करायची इच्छा नसेल तर साध्या न्यूजपेपरच्या फोटो फ्रेम सुद्धा तुम्ही बनवू शकतात.
४. इन्स्पायरिंग कोट
रोज सकाळी उठून स्वतःला मोटीव्हेट करण्याची इच्छा आहे? मग छान टेक्स्चर असलेले कार्डशीट घेऊन त्यावरती तुम्ही आपल्या आवडीचे कोट लिहू शकतात, जसा हॅरी पॉटर मूव्ही मधला डंबलडोअरचा एक खूप प्रसिद्ध डायलॉग की, “Happiness can be found even in the darkest times if one only remembers to turn on the light.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.