कितीही डायट फॉलो केले, कितीही काळजी घेतली तरी वजन वाढतेच. लाईफस्टाइल, फास्टफूडकडे लोकांचा वाढलेला कल, अपुरी झोप या सगळयाचा परिणाम आपल्या वजनावर होतो. कोरोना काळात जेव्हा सर्व लोक घरात होते तेव्हा तर प्रत्येकाचेच वजन वाढले होते. त्या काळात कोरिओग्राफर रेमो डिसोजा यांच्या पत्नीचेही वजन चार पटीने वाढले होते.
वाढलेल्या वजनामुळे रेमो डिसूझा यांची पत्नी लिझेल डिसूझा यांना आत्मविश्वास गमावल्याचे फिलिंग येत होते. कारण, वाढलेल्या वजनामुळे स्वत:ला आरशात पाहताना येणार नैराश्य त्या अनुभवत होत्या. त्यातही प्रसिद्ध व्यक्तीची पत्नी असल्याने सतत कॅमेऱ्याला सामोरे जावे लागायचे.
यामुळेच कोरोनाकाळात वाढलेलं वजन कमी करणयासाठी त्यांनी डायटेशियनची मदत घेण्याचे ठरवले. त्यामुळे लिझेलने सुमारे 40 किलो वजन कमी केले आहे. चाळीस किलो वजन घटवल्याने लिझेलच्या शरीराला सुंदर रूप आले आहे. या बदललेल्या रूपाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. (Lizelle Dsouza Weight Loss Diet)
लिझेल अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये या गोष्टीबद्दल माहिती दिली. येथे लीझेलने तिचे वजन कमी करण्याचे सिक्रेट जाहीर केले आहे. लिझेल म्हणते की, मी वजन कमी करण्यासाठी डायटेशियन नेहाची मदत घेतली. तिने मला किटो डायट करण्याचा सल्ला दिला.
नेहाने मला हार्ड केटो डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला. नेहाने मला डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला लावल्या. ज्या भाज्यांबद्दल मी कधी ऐकलंही नव्हतं. त्या काळात मला त्या भाज्या खायच्या होत्या. वजनासाठी मी ते केलं.
डाएटसोबतच व्यायाम आणि वर्कआउटचीही गरज आहे. आणि नेहाने तिला हार्ड एक्सरसाईज करायला लावली. लिझेलने सांगितले की, कोरोनाच्या काळात तिने आठ महिन्यांत आठ किलो वजन कमी केले आहे.
काही आरोग्य तपासण्या केल्या तेव्हा त्याचा रिझल्ट दिलासादायक होता. कारण, रक्त तपासणीत त्याचे फॅटी लिव्हर आणि इतर अनेक समस्या दूर झाल्या.
लीझेलने सांगितले की 2020 पासून आतापर्यंत मी 40 किलो वजन कमी केले आहे. मात्र, आता माझे वजन पुन्हा दहा किलोने वाढले आहे, जे कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
लोकांना सल्ला देताना लीझेलने सांगितले की, एका रात्रीत वजन कमी करता येत नाही. हे निरोगी मार्गाने कमी करणे महत्वाचे आहे, यासाठी संयम ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.