Lohari Special Outfits : मकर संक्रांतीचा सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मकर संक्रांतीपूर्वी देशात लोहरी आणि भोगी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा लोहरी आणि भोगी रविवारी (१४ जानेवारीला) साजरी केली जाणार आहे.
लोहरीच्या दिवशी पारंपारिक लूक करण्यावर अनेक महिलांचा भर असतो. या दिवशी खास दिसण्यासाठी आऊटफीट्ससोबतच, मेकअप आणि हेअरस्टाईलची देखील खास तयारी केली जाते.
यंदा काय लूक करावा? असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल, तर चिंता करू नका. कारण, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूक्सबद्दल काही टिप्स देणार आहोत. या लूक्सपासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमची लोहरी स्पेशल करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या फॅशन टिप्स
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने परिधान केलेला हा नारंगी रंगाचा शरारा सूट लोहरीसाठी एकदम बेस्ट आहे. अनन्यासारखा शरारा सूट तुम्ही लोहरीला परिधान करू शकता.
यावर मिनिमल मेकअप करून आणि केसांची छान हेअरस्टाईल करून तुम्ही तुमचा लूक आणखी बेस्ट करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला या प्रकारचे शरारा सूट सहज मिळतील.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन लूक्ससाठी खास ओळखली जाते. लोहरीसाठी तुम्ही सोनाक्षी सिन्हाच्या या रॉयल पर्पल लूककडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. नेहमीचे लाल आणि हिरवे रंग परिधान करण्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि रॉयल लूक करण्यासाठी तुम्ही जांभळ्या रंगाचा हा शरारा सूट नक्कीच परिधान करू शकता.
या पर्पल कलरच्या शरारा सूटवर तुम्ही सिल्वर किंवा ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कॅरी करू शकता. तसेच, यावर सोनाक्षीप्रमाणे मोकळ्या केसांची हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप केला तर तुमचा लोहरी स्पेशल लूक एकदम रेडी आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयाने आणि उत्तम फॅशन सेन्सने चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेते. लोहरीसाठी तुम्ही आलियाच्या सुंदर लाल रंगाच्या आऊटफीटपासून प्रेरणा नक्कीच घेऊ शकता.
या सुंदर आऊटफीटवर आलियाप्रमाणे तुम्ही देखील छान अंबाडा हेअरस्टाईल करू शकता आणि आऊटफीटवर मॅच होणारे लॉंग गोल्डन किंवा सिल्वर झुमके तुम्ही नक्कीच कानात घालू शकता. या झुमक्यांमुळे तुमच्या आऊटफीटला एक वेगळाच लूक येईल, यात काही शंका नाही. मग, मिनिमल मेकअपने हा लूक आणखी खुलवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.