शाळा-कॉलेजपासून जपलेलं प्रेम काही कारणाने दुरावंत. हे प्रेम सोबत आहोत तोवर टिकतं अन् जेव्हा उच्च शिक्षण किंवा जॉबसाठी जोडपी दुरावतात तेव्हा तुटतं. अनेकांच्या बाबतीत असं घडलेलं असु शकतं. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतला आहे. पण असं का होतं याचा विचार केला आहे का?
खरं प्रेम कधीच तुटत नाही असं म्हटलं जातं. पण, ७-८ वर्षांहून अधिक काळ एकत्र राहून सुद्धा जेव्हा नात्यात दूरावा येतो तेव्हा हे नातं कोलमडून जातं. सध्या लाँग डिस्टंन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) मध्ये राहणाऱ्या अनेक जोडप्यांना हीच भिती सतावत असते. की ते निभावत असलेलं नातं किती काळ टिकेल.
तुम्हीही अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर त्यासाठी काही गोष्टींचा विचार करा. आज आम्ही तुम्हाला Long Distance Relation कसं टिकवायचं याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी 24 तास बोलत बसलं पाहिजे. कमी बोलूनही तुम्ही तुमच्या नात्यात गोडवा ठेवू शकता.
बोलताना हे लक्षात घ्या की, सतत नात्याचं भविष्य, भूतकाळ अन् वर्तमान यावर चर्चा करू नका. तर, तुम्ही सकारात्मक मुद्द्यांवर बोलून तुमचे नाते मजबूत करू शकता. तसेच, संभाषणात अशा गोष्टींचा समावेश करू नका, ज्यामुळे तुमच्यात वाद निर्माण होतात.
जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने कुठल्याही नात्यात अडथळे येऊ लागतात. म्हणून, तुम्ही तुमच्या जोडीदाराचे शक्य तितके ऐकण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराचा मुद्दा चुकीचा असला तरी तो किमान ऐकून घ्या. त्याला ती गोष्ट चुकीची आहे हे थेट सांगू नका. काही उदाहरणे देऊन पटवून द्या. यामुळे, जोडीदार कुठलाही निर्णय घेण्याआधी तुमच्याशी सल्ला मागेल.
तुम्ही जोडीदाराला रोज भेटणारे असा वा सहा महिन्यातून एकदा भेटणारे. तुम्हाला जोडीदारावर पूर्ण विश्वास असायला हवा. तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हे लक्षात घ्या की, विवाहित जोडप्यामधील नाते केवळ विश्वासाच्या आधारावर चालतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवणे थांबवता तेव्हा नातेसंबंध बिघडू लागतात.
त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवा. तुम्हाला काही कमी जाणवली किंवा जोडीदार काही लपवतोय असे वाटले तर त्याला थेट विचारा. त्याच्याशी चर्चा करा. त्यामुळे नात्यात अधिक स्पष्टपणा येईल.
जेव्हा तुम्ही जोडीदारापासून दूर असता तेव्हा सतत भेटण्याची ओढ लागलेली असते. ही ओढ तुमच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देते. त्यामुळेच जोडीदाराला सरप्राईज द्या. अचानक त्याला भेट द्या. ज्यामुळे त्यालाही आनंद होईल अन् नात्यातील गोडवा कायम राहीलं.
प्रत्येक नात्यात जोडीदाराचा सन्मान,आदर करणं महत्त्वाचं आहे. आदरामुळे नात्यांचे बंध दृढ होतात, त्यामुळे एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराप्रती असलेला आदर तुमच्या नात्याला अधिक ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही त्यांना वेळ द्या, कारण वेळ काढूनच ते तुमच्याशी बोलतात. अशा परिस्थितीत त्यांचे आदरपूर्वक आणि प्रेमळ शब्दांत आभार मानावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.