हेअर केअर रूटीनमध्ये आपण दह्याचा समावेश केल्यास केसांना विभिन्न लाभ मिळतील, यात काही शंकाच नाही. सुंदर व मऊ केस मिळवण्यासाठी कित्येक जण नैसर्गिक उपाय म्हणून दह्याच्या मास्कचा वापर करतात. दह्यातील औषधी गुणधर्मांमुळे केस तसंच स्कॅल्पची त्वचा निरोगी राहते. दुभंगलेले केस, केसांचा कोरडेपणा इत्यादी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
दह्यामध्ये कॅल्शिअम आणि कॅसीन यासारखे महत्त्वपूर्ण पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषणतत्त्व केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त दह्यामध्ये असणारे झिंक व फॉलेट देखील केसांसाठी फायदेशीर असू शकते. शिवाय व्हिटॅमिन बी- ६ हे कोंड्याची समस्या दूर करण्याकरिता प्रभावी स्वरुपात कार्य करू शकते.
दह्यामध्ये कॅल्शिअम आणि कॅसीन यासारखे महत्त्वपूर्ण पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषणतत्त्व केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त दह्यामध्ये असणारे झिंक व फॉलेट देखील केसांसाठी फायदेशीर असू शकते. शिवाय व्हिटॅमिन बी- ६ हे कोंड्याची समस्या दूर करण्याकरिता प्रभावी स्वरुपात कार्य करू शकते.
सामग्री :
एक वाटी दही
एक केळे
ऑलिव्ह ऑईलचे दोन ते तीन थेंब
कसे तयार करावे हेअरमास्क?
केळे योग्यरित्या मॅश करून पेस्ट तयार करा
आता यामध्ये दही व ऑलिव्ह ऑईल मिक्स करा
मिश्रण तयार झाल्यानंतर संपूर्ण केसांना व स्कॅल्पवर लावा
कंगव्याच्या मदतीने केसांमधील गुंता सोडवावा, म्हणजे मास्क लावणे सहजसोपे होईल.
१० मिनिटांकरिता हेअर मास्क लावून ठेवावा
यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.
आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता.
केसांना मिळणारे लाभ
दही व केळ्यातील औषधी गुणधर्म केसांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. दह्यामध्ये ‘व्हिटॅमिन ए’चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ‘व्हिटॅमिन ए’मुळे शरीरातील एपिथेलियल टिशूची (Epithelial tissues) वाढ होण्यास मदत मिळते आणि यामुळे आरोग्यही निरोगी होते. शिवाय यामुळे केसांची वाढही उत्तमरित्या होते. केळ्यामधील ‘व्हिटॅमिन ई’ या पोषकघटकामुळे सिलिका आणि पोटॅशिअम कोलेजनची निर्मिती होण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.