Coconut Milk For Hair : लांबसडक केस मिळवण्यासाठी 'या' दुधाचा करा उपयोग, मिळतील अनेक लाभ

Coconut Milk For Hair केसांची वाढ योग्य पद्धतीने व्हावी, याकरिता आपण अनेक उपाय करून थकले आहात का? पण आता काळजी करू नका.
Coconut Milk For Hair
Coconut Milk For HairSakal
Updated on

आपले केस लांबसडक, मऊ व काळेभोर असावेत; अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण याकरिता केसांची योग्य पद्धतीने देखभाल करणंही तितकेच महत्त्वाचे असते. कारण केसांची योग्यपद्धतीने काळजी न घेतल्यास केस कोरडे होणे, केसगळती होणे, कोंडा इत्यादी समस्या उद्भवतात.

Coconut Milk For Hair
Black Hair Tips: खोबरेल तेलात टाकून लावा या 2 गोष्टी, पांढरे केस काही दिवसातच होतील काळे!

केसांची वाढ योग्य पद्धतीने व्हावी, याकरिता आपण अनेक उपाय करून थकले आहात का? पण आता काळजी करू नका. या लेखाद्वारे आपण केसांच्या वाढीकरता पोषक व लाभदायक असणाऱ्या रामबाण उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. केसांना नैसर्गिक स्वरुपात प्रोटीन व पोषकतत्त्वांचा पुरवठा व्हावा, यासाठी आपण नारळाच्या दुधाचा उपयोग करू शकता.

Coconut Milk For Hair
Hair Tips : रात्री झोपताना केस मोकळे सोडले तर काय बिघडते?

नारळाच्या दुधाचा केसांसाठी कसा वापर करावा, यापासून केसांना कसे लाभ मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

केसांसाठी नारळाच्या दुधाचे फायदे (Coconut Milk Benefits For Hair Growth)

नारळाचे दूध केसांसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण याद्वारे केसांना नैसर्गिक स्वरुपात अनेक पोषकघटकांचा पुरवठा होतो.

Coconut Milk For Hair
दह्याचा वापर करुन मिळवा लांबसडक, घनदाट केस, पाहा टिप्स

नारळ योग्य पद्धतीने किसून त्यानंतर आपण त्याचे दूध काढू शकता. यातील फॅट्स केसांना मॉइश्चराइझ करतात, ज्यामुळे केस मऊ होण्यासह गुंता होण्याची समस्याही दूर होते. तसंच दुभंगलेल्या केसांची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते. नारळाचे पाणी शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असते, त्याचप्रकारे नारळाचे दूध केसांकरिता आवश्यक आहे.

Coconut Milk For Hair
पांढरे केस पुन्हा काळे करा, या टिप्स करा फॉलो Hair Care

केस वाढण्याकरिता नारळाचे दूध कसे उपयुक्त ठरते?

केसांची योग्य पद्धतीने निगा राखण्याकरिता नारळाचे दूध एक रामबाण घरगुती उपाय मानला जातो. याने केस व स्कॅल्पचा मसाज करून नंतर आपण केस धुऊ शकता. नारळाच्या दुधामध्ये नैसर्गिकरित्या पाणी व तेलाचा समावेश असतो.

Coconut Milk For Hair
Hair Tips : पावसात भिजून आल्यावर केस धुवावेत का? खास उपाय

यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, झिंक आणि लोहाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, हे घटक स्कॅल्पला निरोगी ठेवण्यासाठी व केसांची वाढ करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच कित्येक शॅम्पू व साबण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्येही याचा वापर केला जातो. आता आपण हेअर मास्क कसे तयार करायचे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Coconut Milk For Hair
Hair Conditioner : केस धुण्यापूर्वी अर्धा तास केसांना लावा या 3 गोष्टी, महागडं कंडिशनरही पडेल फेल

कोकोनट मिल्क हेअर मास्क

सामग्री

नारळाचे दूध : एक चतुर्थांश कप  

हेअर मास्क कसे तयार करावे व वापरावे?

नारळ किसून घ्या आणि त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी ओतून मिक्सरमध्ये वाटावे.

Coconut Milk For Hair
Monsoon Hair Care Tips: माझे केस खूप गळतायत, पावसामुळे असावे का?

यानंतर एका वाटीमध्ये दूध गाळून घ्यावे.

आता नारळाचे दूध स्कॅल्पवर लावा व १५ मिनिटे मसाज करावा.

संपूर्ण स्कॅल्पवर नारळाचे दूध लावल्यानंतर शॉवर कॅप घालावी.

४५ मिनिटांनतर एखाद्या सौम्य शॅम्पूनंतर केस स्वच्छ धुऊन घ्यावे.

आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

Coconut Milk For Hair
Hair Care: केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल हे घरगुती हेअर सिरम; पटापट वाढतील केस

काय मिळतील लाभ ?

नारळाच्या पांढऱ्या भागामध्ये फॅट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. हे फॅट्स केसांच्या वाढीकरिता पोषक असते. यामुळे केस निरोगी राहतात. यामुळेच केसांना पोषकघटकांचा पुरवठा व्हावा व केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्याकरिता हे मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कोड्यांची समस्या असल्यास या मास्कचा वापर करू नये.

Coconut Milk For Hair
Hair Growth Tips : वातावरण बदलाने केस होतात जास्तच Damage; हे हेअरमास्क वापरून तर पहा!

नारळाचे दूध व दही

सामग्री:

पाच चमचे नारळाचे दूध

एक चमचा दही

आवश्यकतेनुसार कापराच्या वडीचा चुरा

Coconut Milk For Hair
Hair Care Tips: नखं एकमेकांवर घासल्याने खरंच केस लवकर वाढतात का?

हेअर मास्क कसे तयार करावे व वापरावे?

वरील सर्व सामग्री एक वाटीमध्ये घ्या व एकजीव करा.

आता हे मिश्रण स्कॅल्प व केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत योग्य पद्धतीने लावावे.

तासाभरासाठी हे मास्क लावून ठेवा. आवश्यकता भासल्यास शॉवर कॅप घालावी.

तासाभरानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

Coconut Milk For Hair
Hair Care: केस खूप गळतात, हैराण आहात? रोज करा ही योगासनं, गळती थांबून केस होतील दाट

काय मिळतील लाभ ?

नारळाचे दूध व दहीचे मास्क आपल्या केसांसाठी आवश्यक असलेली सर्व पोषकतत्त्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. नारळातील फॅट्स केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात, आता या मास्कमध्ये दही मिक्स केल्यानं केसांना पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. दह्यामुळे केसांना प्रोटीन मिळते, ज्यामुळे केस मजबूत होतात.  

Coconut Milk For Hair
डोक्यावरचा एखादा जरी पांढरा केस उपटला तरी सगळे केस पांढरे होतात?

तर मग मैत्रिणींनो ब्युटी पार्लरमध्ये हेअर केअरवर हजारो रूपये खर्च करून केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी हा उपाय केल्यास केसांना लाभच मिळतील. पण एकदा हा उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या किंवा तज्ज्ञमंडळींचाही सल्ला घ्यावा.

Coconut Milk For Hair
Hair Care in Monsoon: डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, मग ट्राय करा या टिप्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.