Long Weekend Plans: या विकेंडला नो प्लॅन्स, जोडीदारासोबत क्वालिटी वेळ कसा घालवाल?

चहा, कॉफी आणि गप्पा
Long Weekend Plans
Long Weekend Plansesakal
Updated on

Long Weekend : काही महिने सतत काम केल्यानंतर एखादा आठवडा असा येतो जो अनेक दिवसांची सुट्टी देऊन जातो. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक दिवसांचा Long Weekend भेटणार आहे. त्यामुळे केवळ शनिवार-रविवारी भेटणारे कुटुंबातील सदस्य आता जास्त वेळ एकत्र घालवू शकतात.

असा लाँग विकेंड मिळाल्यानंतर प्रत्येकजण रिलॅक्स होण्यासाठी ट्रिप, पिकनिक, नातेवाईंच्या घरी भेट देणं असे प्लॅन्स करतात. काहीलोक अनेक दिवसांपासून पेंडींग असलेली ट्रिप प्लॅन करतात. नवं लग्न झालेले कपल्स एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी फिरायला बाहेर पडतात.

प्रत्येकालाच हे जमतं असं नाही, त्यामुळे तुम्ही यावेळच्या विकेंडला घरीच असाल तर जोडीदारासोबत वेळ कसा क्वालिटी बनवता येईल याबद्दलची माहिती आज जाणून घेऊयात.

Long Weekend Plans
National Highway : Weekend चा प्लान करताय? मग, पुणे-बंगळुरु महामार्गावर 'अशी' आहे स्थिती!

पावसाळा आहे, या ऋतूत जोडीदारासोबत वेळ घालवणे अधिक रोमँटिक होऊ शकते. विवाहित जोडपी किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वीकेंडमध्ये आपल्या जोडीदारासोबत खास सुट्ट्या घालवण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स आखतात. तुम्ही घरबसल्या पार्टनरला कसं खूश ठेऊ शकाल हे पाहुयात.(Weekend plans)

वन डे प्लॅन करा

आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. वीकेंडला लाँग ड्राइव्ह, वॉटर पार्क किंवा जवळच्या हिल स्टेशनवर कपल्स एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात. सहलीसाठी शहराबाहेर जाता येत नसेल तर जोडीदारासोबत शहरातच फिरा. दुपारच्या जेवणासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जा, पार्कमध्ये जा आणि एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवा.

 एकत्र स्वयंपाक करा

जोडीदाराला घरी सुट्टी घालवायची असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत घरी काहीतरी धमाल करू शकता. जोडीदाराचे आवडते पदार्थ तुम्ही घरीच बनवू शकता. त्यांना स्वयंपाकात आपल्याबरोबर सामावून घ्या. दोघांमध्ये प्रेम वाढेल आणि अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासाठी काहीतरी गोड बनवू शकता.(Relationship)

Long Weekend Plans
RRKPK Box Office Weekend Collection: तीन दिवसात हाफ सेंच्यूरी!'रॉकी और राणी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवर पडतोय पैशांचा पाऊस

चहा, कॉफी आणि गप्पा

आठवडाभर काम असल्याने तुमच्या दोघांमध्ये एकमेकांशी संबंधित कोणतेही बोलणे होऊ शकत नाही. त्यामुळे वीकेंडला पार्टनरला सुट्टी असते तेव्हा दोघेही संध्याकाळी बाल्कनीत किंवा टेरेसवर आल्हाददायक हवामानात चहा किंवा कॉफी घेऊन बसतात आणि मनमोकळेपणाने बोलतात. मात्र, या गोष्टींचे तक्रारीत रुपांतर करू नका, हेही लक्षात ठेवा.

घरीच बनवा डान्स फ्लोअर

एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही दोघेही घरी डिनर किंवा डान्स पार्टी करू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण फक्त आपल्या दोघांना समाविष्ट करू शकता किंवा आपल्या खास मित्रांना आमंत्रित करू शकता. येथे तुम्ही कॅंडल लाईट डिनर करू शकता आणि रोमँटिक गाणी गाऊन डान्स करू शकता. (Dance )

Long Weekend Plans
Weekend Trip: वीकेंड ट्रिपची पिंपळगाव परिसरात क्रेझ! तरुणाईकडून आखले जाताहेत लाँग ड्राइव्हचे प्लॅन

गार्डनमध्ये वेळ घालवा

तुमच्या जोडीदाराला आवडत असेल तर त्यांना छान छान फुलांची झाडे भेट द्या. केवळ भेट नका देऊ तर ती झाडे गार्डन, बाल्कनीत लावण्यासाठी जोडीदाराला मदत करा. जोडीदारासोबत पावसाच्या पाणयात भिजत केलेलं हे काम तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.

चित्रपट पहा

दोघांनी लग्नाआधी एकत्र पाहिलेला चित्रपट पुन्हा एकदा एकत्र बसून पहा. त्यामुळे तुमच्या लव्ह लाईफला एक नवी उर्जा मिळेल. ज्यामुळे तुमचं नातं नव्याने सुरू झाल्यासारखे वाटेल. (Movies)

कौतुकाचा एक तास

कौतुक तुम्हाला एक प्रकारची उर्जा देते. त्यामुळे उत्साह बनून राहण्यासाठी कौतुक फार आवश्यक आहे. जोडीदाराचं वेळोवेळी कौतुक कारा. फक्त चांगल्या गोष्टींचच नाही तर चांगल्या प्रयत्नांचंही कौतुक करा. तुम्हाला रोज वेळ नसेल तर आठवड्याच्या एका दिवशी ठरवून दोघांनीही एकमेकांबद्दलच प्रेम, कौतुक करून पहा. नातं आणखी घट्ट व्हायला मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()