Long Weekend Trip : युरोप विसरा ! चार दिवसांच्या सुट्टीत फिरून या ही स्वस्तात मस्त ठिकाणं, Long Weekend ला बनवा बजेट फ्रेंडली

तुम्हीही अशाच काही ठिकाणांच्या शोधात असाल जी तुम्हाला कमी वेळेत जास्त चांगला अनुभव देऊ शकतील. तर ही काही बेस्ट ठिकाणं नक्की एक्सप्लोअर करा.
Long Weekend Trip
Long Weekend Trip esakal
Updated on

Long Weekend Trip:

आज 15 ऑगस्ट असून सर्वांचे ध्वजारोहण करून झाले असेल. आणि लोकांनी पुढच्या चार दिवसांसाठी करण्याचे प्लॅनिंग हे जोरदार केले असेल. कारण बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा Long Weekend लोकांच्या पदरी पडला आहे. त्यामुळे लॉंग वीकेंडचा फायदा घेण्यासाठी अनेक लोक टूर प्लॅन करतात.

चार दिवसात दोन दिवस फिरण्यासाठी आणि दोन दिवस आरामासाठी असेही काही लोकांचे आयोजन असते. तर काही लोक चार दिवसात जितके फिरता येईल तितके फिरून घेतात. तुम्हीही अशाच काही ठिकाणांच्या शोधात असाल जी तुम्हाला कमी वेळेत जास्त चांगला अनुभव देऊ शकतील. तर ही काही बेस्ट ठिकाणं नक्की एक्सप्लोअर करा. (Long Weekend Trip)

Long Weekend Trip
Republic Day Weekend : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत कुटुंबासोबत भारतातील या ऐतिहासिक स्थळांना भेट द्याच!

आपण फार दूरही जाऊ शकत नाही आणि अगदी जवळचा बघायचं म्हटलं तर आपण सगळे जवळचे प्लेसेस आधीच पाहिलेले असतात. त्यामुळे या चार दिवसात पुरेपूर सुट्टीचा आनंद लुटता येईल अशी कोणती ठिकाण आहेत जी आपल्याला एक नवीन अनुभूती देतील त्यांची माहिती घेऊयात.

कुर्ग

या चार दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही आरामात कुर्ग या हिल स्टेशनला नक्की जाऊ शकता. हे हिल स्टेशन कर्नाटकमध्ये असून ते टुरिस्टमध्ये प्रसिद्ध आहे. कुर्ग हिल स्टेशन मसाले आणि चहाच्या बागीचांसाठी फेमस आहे. या

ठिकाणचे निसर्ग सौंदर्य तुम्हाला स्वर्गात गेल्यासारखेच वाटेल. कारण या ठिकाणी असलेल्या चहाच्या भागांमध्ये पावसाळ्यात धुके आणि छोटे छोटे धबधबे असतात. जे पाहून तुमचं मन अगदी प्रसन्न होईल.

Long Weekend Trip
Weekend Special: झटपट बनवा 5 प्रकारचे ब्रेड पकोडे, वीकेंड होईल स्पेशल
कुर्ग हिल स्टेशन
कुर्ग हिल स्टेशन

नैनीताल आणि भीमताल

तुम्ही या चार दिवसांच्या टूरमध्ये भीमताल आणि नैनीताल या हिल स्टेशनवर जाऊ शकता. नैनीतालमध्ये तुम्ही नैनी तलावाची सफर करू शकता. या तलावात तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता. नैनीतालमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणची सफर करता येईल. तसेच, तुम्ही भीमताल या पॉईंटलासुद्धा जाऊ शकता. हे सुद्धा एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून ते नैनीतालच्याच बाजूला आहे.

नैनीताल आणि भीमताल
नैनीताल आणि भीमतालesakal
Long Weekend Trip
Long Weekend Traffic: विकेंडसाठी महाबळेश्वरला जाताय? पुणे-सातारा महामार्गावर ट्रॅफिक जामची शक्यता, 'या' घाटात घ्या काळजी

वागामों हिल स्टेशन

केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून वागामो प्रसिद्ध आहे. हे हिलस्टेशन समुद्रसपाटीपासून १ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहे. हे अतिशय मनमोहक आणि नयनरम्य हिलस्टेशन आहे. या परिसरातील उंच पर्वत, घनदाट जंगले, तलाव आणि धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे, देश-विदेशातील अनेक पर्यटकांची येथे मांदियाळी पहायला मिळते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन आहे.

वागामों हिल स्टेशन
वागामों हिल स्टेशनesakal
Long Weekend Trip
Long Term Relationships : प्रेयसींना धोका देत नाहीत दाढी असणारे पुरूष; अभ्यासातून माहिती आली समोर

औली

हे दोन्ही सुंदर हिल स्टेशन उत्तराखंडमध्ये आहेत. औली हिल स्टेशनला मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. हे हिल स्टेशन बर्फाच्छदीत आहे. औली हिल स्टेशन बद्रिनाथतच्या वाटेवर आहे. दरवर्षी इथे लाखो भाविक येतात. जे बद्रिनाथला जातात अन् वाटेत या हिल स्टेशनलाही भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.