Shravan 2024 : श्रीलंकेत आहे भगवान शंकरांचे मंदिर, श्री रामांनी केली होती इथे पूजा

भगवान शंकरांचे श्रीलंकेत असलेले हे मंदिर प्राचीन पंच ईश्वरमचा एक भाग आहे.
Shravan 2024
Shravan 2024esakal
Updated on

Lord Shiv Temple In Shri Lanka  : 

भगवान शंकरांची उपासना जगभरात केली जाते. पुरातन काळापासून जगात भगवान शंकरांची माहिती सांगितली जाते. श्रीरामांनी अयोध्यापासून श्रीलंकेपर्यंत प्रवास केला. श्रीलंकेत त्यांच्या पाऊलखुणा आजही आहेत. माता सीतेला ज्या अशोक वाटिकेत राहावं लागतं तिथे बजरंग बली हनुमानाची पावले आहेत.

श्रीलंकेत एक महादेवांचे मंदिर देखील आहे, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. श्री मुन्नेश्वरम असे याचे नाव असून हे मंदिर पुरातन असलं तरी ते अद्याप सुस्थितीत आहे. आजही मंदिरात पूजाअर्चा होते. त्या मंदिराची वैशिष्ट्य आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया.

Shravan 2024
Lord Ram Rangoli Designs : रामलल्लाच्या स्वागतासाठी दारापुढे काढा आकर्षक अन् सुंदर रांगोळी; पाहा या सोप्या डिझाईन्स

मुन्नेश्वरम मंदिर हे मुन्नेश्वरम गावात स्थित आहे. जे मुन्नेश्वरम पट्टुवा नावाच्या मध्ययुगीन शासकांच्या काळात बांधण्यात आले होते. मुन्नेश्वरम पट्टुवामध्ये प्रत्यक्षात ६० हून अधिक गावे समाविष्ट होती. श्रीलंकेत असलेल्या इतर हिंदू मंदिरांपैकी हे मंदिर अधिक लोकप्रिय आहे. या मंदिराचा थेट रामायणाशी संबंध असल्याचे म्हटले जाते.

भगवान शंकरांचे श्रीलंकेत असलेले हे मंदिर प्राचीन पंच ईश्वरमचा एक भाग आहे. हे मंदिर भव्य दिव्य आहे तसेच ते प्राचीन सुद्धा आहे. या मंदिर परिसरात पाच मंदिर आहेत. त्यापैकी भगवान शिवाला समर्पित मंदिर सर्वात प्रमुख आहे. या संकुलात बौद्धांचेही एक मंदिर आहे. संकुलातील इतर मंदिरे भगवान गणेश, देवी काली आणि भगवान अय्यानायके यांना समर्पित आहेत.

Shravan 2024
Lord Shree Ram Photo : वयाच्या २१ व्या वर्षी प्रभू श्रीराम कसे दिसायचे?

असेही म्हटले जाते की त्या काळात चोल आणि जाफना अशा विविध साम्राज्यातील लोक या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येत असत. स्थानिक साहित्यातही या शिवमंदिराचा उल्लेख आढळतो. येथे असलेले काली मंदिर हे काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहे.  

येथे असलेले गणेश मंदिर 19व्या शतकात दक्षिण भारतातून आलेल्या कारागिरांनी बांधले होते. येथे उपस्थित असलेल्या भगवान शिवाच्या मंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आले आहे. अशा या मंदिराला नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.