रिलेशनशीपला नेहमी उत्साहवर्धक बनवण्यासाठी कपल्स (Couples) वेगवेगळे प्रयोग करत असतात. नात्यात प्रेमासोबत समजूतदारपणा असणे गरजेचे आहे. नात्याला सांभाळून पुढे जाता आले पाहिजे. नात्यात सतत गैरसमज आणि अविश्वास असेल तर ते नात टिकत नाही. याउलट छोट्या- छोट्या गोष्टीतून होणारे वाद-विवादामुळे संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास होतो. भारतात अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे प्रत्येक नात्याला सुंदर ठेवण्यासाठी त्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. नात टिकावे यासाठी काही टिप्स देणार आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
पार्टनरला वेळ द्यायला शिका
नात्यात संवाद असायला हवा. बरेच कपल्स असे असतात ज्यांना एकांत खूप आवडतो. एकामेकांच्यात दखल केलेली काहींना आवडत नाही. काही लोकांना मोबाईलवर जास्त वेळ घालवायला आवडतो, तर काहींना टीव्ही बघायला आवडते. हे करत असताना तुम्ही तुमचा काही वेळ तुमच्या पार्टनर (Partner) सोबत घालवणे गरजेचे आहे. यातुन एकमेकांना समजून घेण्यास वाव मिळतो.तसेच नात घट्ट होण्यास मदत होते.
व्यक्त व्हायला शिका
आपल्या जोडादारासमोर व्यक्त व्हायला शिका. यासाठी वेगळा दिवस पाहिजे असे नाही. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्याशी बोलू शकता. कधी कधी चांगल्या गोष्टीचे कौतुक करा. यातुन पार्टनर पण आनंदी होईल. तुम्ही जेव्हा पार्टनर सोबत वेळ घालवता तेव्हा तो दिवस तुमच्यासाठी खास असतो.
संकटात नेहमी तयार रहा
कोणतच नात असे नाही ज्यात अडचणी येत नाहीत. तुम्ही अशावेळी नेहमी सतर्क असले पाहिजे. तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा त्रास होतो हे तुमच्या पार्टनरला सांगा. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला. सांगितल्यानंतर काय परिणाम होईल हा विचार करून कुटत न बसता त्याच्याशी संवाद साधा. वेळ द्यायला शिका.
सोबती नाही तर मित्र बनवा
तुमच्या पार्टनरवर तुमचे खूप प्रेम असेल तर त्याला सपोर्ट करणे ही तुमची जबाबदारी आहे. यामुळे नात्यात एकमेकांना सपोर्ट केल्यान नात घट्ट होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या पार्टनरशी चांगली मैत्री करा. पार्टनरची एखादी गोष्ट खटकत असेल तर त्याला चांगल वाईट यातील फरक जाणवून द्या. एकमेकांना साथ दिल्याने नाते नव्याने खुलण्यास मदत होईल.
या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे नात अधिक सुंदर होण्यास नक्कीच मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.