छंद माझे : कविता हा ‘पॅशन’चाच भाग

छंद या शब्दाची तुमची व्याख्या काय आहे? माझ्यासाठी छंद म्हणजे मन रमवण्यासाठी, रिझवण्यासाठी फावल्या वेळेत केली जाणारी कृती.
My Passion Poem
My Passion Poemsakal
Updated on

छंद या शब्दाची तुमची व्याख्या काय आहे? माझ्यासाठी छंद म्हणजे मन रमवण्यासाठी, रिझवण्यासाठी फावल्या वेळेत केली जाणारी कृती. आपल्या नेहमीच्या कंटाळवाण्या आयुष्यात असं एक काम ज्यामध्ये आपण एकरूप होतो, तो छंद. मला अभिनय आवडतो, कविता वाचायला आवडतं, गाणं गायलाही आवडतं. पण तो माझा फावल्या वेळात करण्याचा छंद नाही तर ते माझं पॅशन आहे.

मी जितक्या पॅशनेटली अभिनय करते, तितक्याच पॅशनेटली मी गाणंही गाते आणि कविताही वाचते. मला सगळ्या गोष्टी भरभरून कराव्याशा वाटतात. मी अभिनय करते, तेव्हा मला गाता येत नाही याचं वाईट वाटतं. एखादी कविता वाचून मी दोन-तीन दिवस अस्वस्थ असते, त्या कवितेत खोलवर बुडून जाते. मला वाटतं छंद हा आपल्यापुरता असतो. माझा कोणताही छंद स्वतःपुरता नाही, जे आहेत ते एकदम दिलतोड आहेत.

सुदैवाने मी माझ्या छंदात, आवडीच्या गोष्टीतच काम करते. हल्ली लोक यंत्रवत झाले आहेत. अशा यंत्रवत आयुष्यात छंद आपल्याला जगल्याची भावना देतात; पण मी रोज जगते आणि भरभरून जगते. मी अगदी लहानपणापासूनच अभिनय, कविता, वक्तृत्व हे सगळं करत होते. मुलीच्या जन्मानंतर बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर मला एका कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मिळाली.

त्या निवेदनासाठी मी काही चांगल्या कविता शोधत होते. तेव्हा मला कविता तोंडपाठ नव्हत्या, कवितांची फारशी पुस्तकंही माझ्याकडे नव्हती. म्हणून मी इंटरनेटवर कविता शोधत होते; पण त्यावर मला मराठी कविता विशेष दिसल्या नाहीत. ही गोष्ट आठ-नऊ वर्षांपूर्वीची आहे.

त्यावेळी मला जाणवलं, की पुढच्या पिढीला कविता आपलीशी करायची असेल तर ती इंटरनेटवर असायला हवी. ते युट्यूबवर असायला हवं, चिरकाल टिकायला हवं याचं विचारातून ‘कवितेचं पान’ सुरू झालं. पुढच्या पिढीला कवितांची गोडी लागावी, असं मला वाटलं. हे जे वाटणं आहे त्याचं मी काहीतरी करतेच. ते फक्त छंद म्हणून ठेवत नाही. यासाठी वेड्यासारखं पॅशन लागतं.

गेल्या वर्षभरात मला फारसे कवितांचे कार्यक्रम करायला जमले नाहीत. त्यामुळे नवीन वर्षात मी जास्तीत जास्त कार्यक्रम करायचा प्रयत्न करेन. गाण्याचा रियाज करायला मला फारसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे या वर्षात मी थोडा जास्त रियाज करेन. या वर्षभरात काही नवीन कल्पनाही विचारात आहेत. मी एक चित्रपट करत आहे, त्याचं चित्रीकरण या वर्षात सुरू होईल.

गेल्या वर्षभरात व्यवसायामुळे मला माणसांचं निरीक्षण करण्याचाही छंद जडला आहे. एखादा माणूस एखाद्या परिस्थितीत कशा पद्धतीने व्यक्त होतो, त्याच्या व्यक्त होण्यामागे कोणत्या गोष्टी असतील, असा विचार करायला मी सुरुवात केली आहे. शिवाय, मी अधिक बारकाईनं गाणं ऐकायला लागले आहे. आपण जेव्हा गाणं ऐकत जातो, तेव्हा त्या गाण्याची खोली आपल्याला अधिकाधिक कळते.

गाण्याचा स्वर अन् स्वर अनुभवते, समजून घेते. सूक्ष्मतेनं गाणं ऐकण्याचा जणू मला छंद जडला आहे; पण हा छंद माझ्या कामासोबतच होत राहतो. खरंतर ती कामाची गरजच आहे. त्यामुळे या माध्यमातून प्रत्येक गोष्टीच्या सूक्ष्मतेकडे जाण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि हे आयुष्यभर शिकतच राहणार आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()