सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाते.
तामिळनाडूत हा सण 'भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी गावात दारासमोर रांगोळी काढली जाते.
तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे.
भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घरा-घरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते.
भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं.
आज शिख साजरी करणार लोहरी
लोहरी हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या शेवटच्या रात्री साजरा केला जातो. शिखांसाठी लोहरीला विशेष महत्त्व आहे. हा एक लोकप्रिय कापणीचा सण आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.