Astro Tips : चपाती बनवताना करू नका या चुका?; नाहीतर भोगावे लागणार वाईट परिणाम!

पैशाची बचत आणि अन्नाची नासाडी रोखण्यासाठी हे फायदेशीर आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही.
Astro Tips
Astro Tips
Updated on

कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन चविष्ट जेवण प्रत्येक घरात बनवले जाते. पूर्वीच्या काळात स्वयंपाकघरात भरभराट होती. त्यामुळे खाण्यावर मर्यादा नव्हती. जास्त जेवण बनवले जायचे त्यामुळे पुरेसे जेवण शिल्लक असायचे. कोणी भुकेलेला माणूस अचानक घरात आला तरी तो पोटभर जेवायचा. पण, काळ बदलला आणि जेवण बनवण्याच्या पद्धतीत, प्रमाणातही बदल झाला. जेवण कमी प्रमाणात बनवले जाऊ लागले. पैशाची बचत आणि अन्नाची नासाडी रोखण्यासाठी हे फायदेशीर आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. (Astro Tips for Roti)

जेवण करताना पीठ मळण्यापासून चपाती बनवण्यापर्यंत अनेक नियम आहेत. या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. स्वयंपाक घरात कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर त्याचा परिणाम घरावरही होतो. तुम्ही केलेल्या या छोट्या चुका घरातील घरातील सुख-शांती, समृद्धी हिरावून घेऊ शकतात. त्यामुळेच चपाती बनवताना या वास्तू नियमांची काळजी घ्या.

एखादी चपाती जास्तीची करा

जेवण वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे. पण, वास्तुशास्त्रानुसार घरातील व्यक्तींसाठी चपाती बनवल्यानंतर चार ते पाच जास्तीच्या चपाती बनवा. यातील पहिली गायीला तर शेवटची कुत्र्याला खाऊ घालणे शुभ मानले जाते.

Astro Tips
Science Wonder : उंदिर केळी नाहीतर, केळी उंदरांना पळवतात, सायन्सची कमाल

पाहुण्यांची काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार घरी येणारा पाहुणा हा देवासारखा असतो. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्याला कधीही उपाशी पाठवू नये. जेवण बनवताना पाहुण्यांसाठी प्रत्येकी किमान दोन चपाती बनवाव्यात. यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि घरामध्ये अन्नधान्याची भरऊराट होईल.

शिल्लक चपात्यांचे काय कराल ?

समजा, जेवण करूनही पाहुणे आले नाहीत किंवा जेवण शिल्लक राहिले तर त्या चपात्या कुत्र्यांना, मांजरांना किंवा पक्ष्यांना खायला द्या.

शिळ्या कणकेची चपाती नकोच

वास्तुशास्त्रानुसार, शिळ्या कणकेपासून बनवलेली चपाती घरातील अडचणींचे कारण बनते. यासोबतच पिठात अनेक प्रकारचे बॅक्टेरियाही निर्माण होतात. त्यामुळे कणीक मळून फ्रीजमध्ये ठेवू नका. शिळ्या पिठाची चपाती राहुशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही कुत्र्याला शिळ्या पिठाची चपाती देऊ शकता. तर ताजी चपाती मंगळ गृह मजबूत करते.

Astro Tips
'ही' कॉफी प्यायलाने वजन कमी होते? तुम्ही कधी ट्राय केली का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.