Weekend Special: झटपट बनवा 5 प्रकारचे ब्रेड पकोडे, वीकेंड होईल स्पेशल

नाश्ता सकाळचा असो किंवा संध्याकाळचा ब्रेड पकोडे खायला सर्वांनाच आवडते.
Weekend Special: झटपट बनवा  5 प्रकारचे ब्रेड पकोडे, वीकेंड होईल स्पेशल
Weekend Special: Sakal
Updated on

make ypur weekend special with bread pakoda know types veg pakoda paneer pakoda potato pakoda

अनेकांना ब्रेड पकोडे खायला खुप आवडतात. नाश्ता सकाळचा असो किंवा संध्याकाळचा ब्रेड पकोडे खायला सर्वांनाच आवडते. पकोड्याचे अनेक प्रकार आहेत. बेसण, आलू, पनीर आणि पालक यासारखे अनेक प्रकार आहेत. तुम्ही या वीकेंडला ब्रेड पकोड्याच्या ५ प्रकारचा आस्वाद घेऊ शकता.

  • मसाला ब्रेड पकोडा

साधा आणि बटाट्याचा ब्रेड पकोड्यांपेक्षा हा खूप वेगळा असतो. यामध्ये बटाटा मसाला भरण्याऐवजी दाबेली मसाला भरून तळून घ्यावे आणि या चविष्ट मसाला गरमागरम आस्वाद घ्या. दाबेली मसाला खूप चवदार असतो. तुम्ही त्यात भरपूर शेव, डाळिंबाचे दाणे, हिरवी चटणी आणि गोड चटणी घालून हा पकोडा आणखी चविष्ट बनवू शकता.

  • साधा ब्रेड पकोडा

पकोड्यांचा हा एक सोपा प्रकार आहे. जो तुम्ही कमी वेळात अगदी सहज घरीच तयार करू शकता. हा पकोडा बनवण्यासाठी ब्रेडचे तुकडे करून बेसनाच्या पिठात मिक्स करून तळून घ्या आणि चटणीसोबत सर्व्ह करा.

Weekend Special: झटपट बनवा  5 प्रकारचे ब्रेड पकोडे, वीकेंड होईल स्पेशल
Ice- Cream Cone Recipe: हायजीनची चिंता वाटते? घरीच बनवू शकता कुरकुरीत आईस्क्रीम कोन; मुलं होतील खुश
  • मिक्स व्हेज ब्रेड पकोडे

मिक्स व्हेज ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आवडत्या भाज्या मिक्स करून मिश्रण तयार करू शकता. नंतर ब्रेडच्या मध्यभागी टाकावे आणि तेलात तळावे. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. अनेकांना हा पकोडा खायला आवडतो कारण चविष्ट आणि आरोग्यदायी असतो.

  • इनसाइड आउट ब्रेड पकोडा

हा ब्रेड पकोडा चविष्ट बटाटा मसाला भरून नंतर बेसनाच्या पिठात मिक्स करून तळला जातो. हा पकोडा खायला चविष्ट आणि बनवायला सोपा आहे. बटाट्याच्या ब्रेड पकोड्यासारखा दिसत असला तरी त्याची चव आणि बटाट्याच्या भाचीची चव खूप वेगळी आहे.

  • पनीर पकोडा

पनीर पकोडा चवदार आणि आरोग्यदायी आहे. तुम्ही या वीकेंडला पनीर पकोडा बनवू शकता. हा पकोडा बटाटा पकोड्यापेक्षा खुप वेगळा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.