आता मेकअपविनाही दिसेल चमकदार चेहरा; करा घरगुती उपायांचा वापर

आता मेकअपविनाही दिसेल चमकदार चेहरा; करा घरगुती उपायांचा वापर
253973952008102
Updated on

नागपूर : सुंदर, आकर्षक चेहरा हा प्रत्येकालाच आवडतो. सुंदर चेहऱ्याचे कौतुक व्हावे असे मुलींना नेहमी वाटत असते. यासाठी मुली कोणताही उपाय करण्यास तयार असतात. महागडे स्किन केअर प्रॉडक्टचा मुली सतत वापर करीत असतात. मात्र, याचा तात्पुरता परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. याबरोबरीनेच सध्या चमकदार आणि सुंदर चेहऱ्यासाठी आणखी एका पर्यायाला तरुण वर्गाची पसंती मिळताना दिसते. तो पर्याय म्हणजे स्किन ट्रिटमेंट. स्किन ट्रिटमेंटसाठी मुली हजारो रुपये खर्च करीत आहेत. परंतु, याचा देखील तात्पुरता परिणाम चेहऱ्यावर दिसतो. याऐवजी घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. यामुळे मेकअपविना देखील तुमचा चेहरा चमकदार दिसू लागतो. (Makeup-Bright-face-Home-remedies-Beautiful-attractive-face-nad86)

प्रत्येक ऋतूनुसार चेहऱ्यामध्ये बदल जाणवतो. गरमीच्या दिवसांमध्ये चेहरा अगदी तेलकट दिसू लागतो. अशावेळी काही चांगले आणि फायदेशीर उपाय चेहऱ्यासाठी करू शकता. मऊ व चमकदार त्वचेसाठी तुम्ही हजारो उपाय करीत असाल. अनेक क्रिम्स, मेकअप प्रॉडक्टचा वापर करता. नेहमीच चिरतरुण दिसावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. फक्त मुलीच नव्हे तर मुलं देखील चेहऱ्यासाठी विविध उपाय करतात. तरुण मुलं तर पार्लरचा देखील पर्याय निवडतात. परंतु, चेहरा चमकदार दिसावा म्हणून काही सोपे उपाय देखील तुम्ही सहज करू शकता.

आता मेकअपविनाही दिसेल चमकदार चेहरा; करा घरगुती उपायांचा वापर
बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

कोरफड

कोरफड शरीरासाठी आणि त्वचेसाठी कितपत उपयोगी ठरते हे ऐकले व वाचले आहे. कोरफडीमध्ये समाविष्ट असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्याला भरपूर लाभ मिळतात. कोरफडीचे जेल झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. चमकदार चेहरा हवा असेल तर रात्रभर चेहऱ्याला कोरफड जेल लावून ठेवा. यामुळे त्वचा अधिक मऊ होते. तसेच चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. ओवरनाइट मास्कप्रमाणे तुम्ही कोरफड जेल चेहऱ्याला लावू शकता. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा कोरफड जेल चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा.

केरामाइड्स

उन्हाळाच्या दिवसांमध्ये कोरड्या त्वचेचा ज्यांना अधिक सामना करावा लागतो त्यांच्यासाठी केरामाइड्स अधिक उपयुक्त ठरू शकते. त्वचा अधिक नाजूक असेल व सतत मुरुमांचा सामना करावा लागत असेल किंवा चेहरा सतत काळवंडलेला वाटत असेल तर केरामाइड्स एखाद्या टॉनिकप्रमाणे कार्य करते. यासाठी केरामाइड्सयुक्त स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करा. ज्यामध्ये फॅटी ॲसिड आणि ग्लिसरीनचा देखील समावेश असावा. अशाप्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकते.

स्क्वालेन तेल

स्क्वालेन तेल चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. नियमितपणे स्क्वालेन तेलाचा वापर केल्याने चिरतरुण दिसण्यास मदत होते. स्क्वालेन ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात येणारे तेल चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेमध्ये समाविष्ट असणाऱ्या स्क्वॅलेनची आवश्यकता या तेलामुळे पूर्ण होते. झोपण्यापूर्वी हे तेल चेहऱ्याला लावल्याने लगेचच तेल चेहऱ्यामध्ये मुरते. त्यामुळे चेहऱ्यावर कोणताच तेलकटपणा जाणवत नाही.

आता मेकअपविनाही दिसेल चमकदार चेहरा; करा घरगुती उपायांचा वापर
नागपूर : पेट्रोल ३९ तर डिझेलमध्ये ३६ वेळा वाढ

लॅक्टिक ॲसिड

लॅक्टिक ॲसिड चेहऱ्यासाठी अधिक उत्तम मानले जाते. याचा चेहऱ्यासाठी वापर केल्याने काही तासांमध्येच फरक जाणवतो. बऱ्याच ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर केला जातो. हे एक अल्फा हायड्रोक्सी ॲसिड आहे. यामुळे तुमचा काळवंडलेला चेहरा देखील नाहीसा होतो. याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ओपन पोर्स अगदी घट्ट होतात. नियमितपणे याचा वापर केल्याने सौंदर्य अगदी खुलून दिसते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(Makeup-Bright-face-Home-remedies-Beautiful-attractive-face-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.