हिवाळा म्हणजे लग्नाचा सिझन. तुळशीची लग्न लागली की ठरवून ठेवलेली लग्नही पार पडायला लागतात. लग्नात नटने मुरडणे आलेच. पण हिवाळ्यात त्वचेची झालेली अवस्था पाहून मेकअप करायची इच्छाच होत नाही. कारण,फुटलेल्या त्वचेमुळे मेकअप सेट होत नाही. मेकअपमुळे चेहरा तेलकट होतो किंवा कोरडा पडतो. त्यामुळे मेकअप करूनही पांढरं पीठ थापल्यासारखाच चेहरा दिसतो.
हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा खूप वाढतो. आणि जर तुम्ही त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले नाही तर ही समस्या आणखी वाढते. जर तुम्ही लग्न किंवा पार्टीला जाणार असाल तर तुम्हाला मेकअप अतिशय काळजीपूर्वक करावा लागेल, अन्यथा कोरडेपणा तुमचा संपूर्ण लुक खराब करेल. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि मिळवा मेकअपचा खरा ग्लो.
मसाजपासून सुरुवात करा
हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी, चांगल्या मॉइश्चरायझरने तुमच्या चेहऱ्याला गोलाकार हालचालीत हळू हळू मसाज करा. कमीतकमी 2 मिनिटे मसाज करा. नंतर हाताने चेहऱ्यावर टॅपिंग करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि मेकअप केल्यानंतर चेहरा अधिक चमकतो. चेहरा कोरडा दिसणार नाही.
फाऊंडेशनमध्ये फेस ऑइल मिक्स करा.जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हेवी मेकअपमुळे चेहरा ठिसूळ दिसू लागतो. हे टाळण्यासाठी तुमच्या फाउंडेशनमध्ये फेस ऑइलचे दोन थेंब घाला. नंतर चेहरा, मान आणि हातांवर लावा. यामुळे तुमचा मेकअप खराब दिसण्यापासून रोखेल.
लाईट मेकअप प्रोडक्ट वापरा
हिवाळ्यात चांगल्या मेकअपसाठी लाईट शेड मेकअप प्रोडक्ट वापरा. मॅट बेससह मेकअप प्रोडक्ट त्वचा कोरडी करतात. जर मेकअप प्रोडकटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतील तर ते आणखी चांगले आहे. फाऊंडेशनमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि कोरडेपणा दिसत नाही.
पावडर उत्पादने वापरू नका
हिवाळ्यात मेकअप करताना पावडर उत्पादने शक्यतो कमीच वापरा किंवा अजिबात वापरू नका, कारण यामुळे सुद्धा चेहऱ्यावर चमक येऊ शकते. त्वचा कोरडी दिसते.. लिक्विड आणि क्रिमी टेक्चरसह क्रीम फाउंडेशन हिवाळ्यासाठी सर्वोत्तम आहेत
हायलाइटर वापरा
हिवाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. फक्त हलका मेकअप केला तर बरे होईल. फाउंडेशन लावल्यानंतर लिक्विड हायलाइटर वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा मेकअपनंतर पूर्णपणे नॅचरल दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.