Makeup Tips For Summer : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या तीव्र उष्णतेमुळे काही लोकांचा बळी देखील गेला आहे. त्यामुळे, या स्थितीमध्ये सर्वांनीच आपल्या आरोग्याची, त्वचेची आणि केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये चेहऱ्यावर मेकअप व्यवस्थित लावणे, हे अतिशय अवघड काम आहे. मेकअप नीट केला नाही तर तो घामामुळे पूर्ण बिघडून जातो.
उन्हाळ्यात चेहऱ्याचा मेकअप कसा करायचा? त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दिवसांमध्ये उन्हाळ्यात मेकअप करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुमचा मेकअप उन्हाळ्यात देखील बराच काळ टिकून राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात मेकअपच्या या सोप्या टिप्स.
चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी तुमची त्वचा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे, तुमच्या चेहऱ्याला जास्त वेळ घाम येणार नाही आणि तुमचा मेकअप ही जास्त वेळ टिकेल.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावा. यामुळे, तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. असे केल्याने चेहऱ्यावर घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की, बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नका. तो नेहमी सुती कापडात गुंडाळून चेहऱ्याला लावा.
फाऊंडेशन हा मेकअपचा सर्वात महत्वाचा भाग आहे. या शिवाय मेकअप पूर्ण होऊ शकत नाही. परंतु, उन्हाळ्याच्या हंगामात चेहऱ्यावर फाऊंडेशन लावणे स्किप करा. कारण, यामुळे, चेहऱ्यावर घाम जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्याऐवजी, तुम्ही चेहऱ्यावर बीबी क्रीमचा वापर करू शकता. जर तुम्हाला फाऊंडेशन लावायचे असेल तर त्याचे प्रमाण खूप कमी ठेवा.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ओठांवर डार्क रंगाची लिपस्टिक लावणे शक्यतो टाळा. डार्क रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे ती घामामुळे पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे, डार्क रंगाच्या लिपस्टिकऐवजी न्यूड रंगाची लिपस्टिक लावा. ज्यामध्ये तुम्ही लाईट गुलाबी, चॉकलेटी असे रंग निवडू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.