Male Contraceptive RISUG : पुरूषांसाठीही आला गर्भनिरोधक उपाय, इंजेक्शन घ्या अन् जोडीदाराला गर्भधारणेपासून दूर ठेवा

हे इंजेक्शन नक्की काम कसं करतं?
Male Contraceptive RISUG
Male Contraceptive RISUGesakal
Updated on

 Male Contraceptive RISUG : आतापर्यंत गर्भनिरोधक उपाय हे केवळ महिलांसाठीच होते. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या महिला घेत होत्या. काहीवेळा गोळ्या नाहीतर कॉपर टीसारख्या घातक यंत्राचा वापरही यासाठी केला जातो.

पण आता महिलांची ही चिंता दूर होणार आहे. कारण,भारतीय संशोधकांनी आता पुरूषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन शोधून काढले आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक पर्याय शोधून काढले आहेत. ज्यामुळे पुरुषांच्या आरोग्यास हानी न होता जोडीदाराची गर्भधारणा टाळता येईल.

अलीकडेच नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, पुरुष गर्भनिरोधक इंजक्शन कोणत्याही दुष्परिणामांशिवाय टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या कमी करू शकतात.

Male Contraceptive RISUG
Pregnancy Tips : २० व्या आठवडे झालेत बाळाने किक मारायला सुरूवात केलीय का? जाणून घ्या किती होते बाळाची वाढ?

गर्भधारणा टाळण्यासाठी महिला सध्या घेत असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. वास्तविक, यामुळे महिलांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या इंजक्शनचा वापर केल्यास गर्भधारणा टाळता येऊ शकते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या गर्भनिरोधकावर संशोधन करत असून त्याला मोठे यश मिळाले आहे. वास्तविक, ICMR ला पुरुष गर्भनिरोधक RISUG सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे.

रिसाग हे नॉन-हार्मोनल इंजेक्टेबल गर्भनिरोधक आहे जे गर्भधारणा रोखण्यात यशस्वी आहे. अहवालानुसार, या संशोधनात 303 पुरुषांनी भाग घेतला. असे सांगितले जात आहे की पुरुषांसाठी हे पहिले यशस्वी गर्भनिरोधक इंजेक्शन आहे जे जोडीदाराची गर्भधारणा दीर्घकाळ रोखू शकते. (Pregnancy Care Tips)

Male Contraceptive RISUG
Pregnancy Tips : मैत्रिणींनो नवव्या महिन्यात घ्या या गोष्टींची काळजी, नॉर्मल डिलिव्हरी तर होईलच सोबत त्रासही कमी होईल

संशोधन काय म्हणते?

इंटरनॅशनल ओपन ऍक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या ओपन-लेबल आणि नॉन-रँडमाइज्ड फेज-III अभ्यासाच्या परिणामांनुसार, २५ ते ४० वर्षे वयोगटातील ३०३ निरोगी, लैंगिकदृष्ट्या सक्रिय आणि विवाहित लोकांना निवडण्यात आले.

कुटुंब नियोजन दवाखान्यातून विवाहीत पुरूषांना या संशोधनातून निवडले. या लोकांना 60 मिलीग्राम RISUG देण्यात आले. अहवालानुसार, या संशोधनात 303 पुरुषांनी भाग घेतला होता. असे सांगितले जात आहे की पुरुषांसाठी हे पहिले यशस्वी गर्भनिरोधक इंजेक्शन आहे जे जोडीदाराची गर्भधारणा दीर्घकाळ रोखू शकते.

या लोकांना 60 मिलीग्रॅम रिसुग देण्यात आले. संशोधनात असे आढळून आले की गर्भधारणा रोखण्यात रिसुग 99.2टक्के यशस्वी होते, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. चाचणीमध्ये 97.3 अॅझोस्पर्मिया आढळले, जो एक वैद्यकीय शब्द आहे जो हे दर्शवितो की स्खलित वीर्यमध्ये शुक्राणू नसतात. संशोधनात सहभागी झालेल्यांच्या पत्नींच्या आरोग्यावर कोणता परिणाम झाला याची माहितीही यावेळी घेण्यात आली.

Male Contraceptive RISUG
Men's Health : वयाची 30 वर्षे उलटताच पुरुषांनी डाएटमधे घ्या हे पदार्थ, आयुष्यभर आजारमुक्त राहाल

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) गेल्या सात वर्षांपासून पुरुष गर्भनिरोधकावर सुधारणा करत आहे आणि त्याला मोठे यश मिळाले आहे. वास्तविक, ICMR ला पुरुष गर्भनिरोधक RISUG सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे. रिसाग हे नॉन-हार्मोनल इंजेक्टेबल गर्भनिरोधक आहे जे गर्भधारणा रोखण्यासाठी प्रभावी आहे.

Male Contraceptive RISUG
Men's Health : पुरुषांनो 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा बाळाचे आरोग्य येईल धोक्यात

Risug म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

Risug हे डाय-मिथाइल सल्फॉक्साइड (DMSO) द्वारे शुक्राणूंच्या नलिकामध्ये स्टायरीन मेलिक एनहाइड्राइड (SMA) नावाचे पॉलिमरिक एजंट इंजेक्शन देण्यावर आधारित आहे. शुक्राणू पेशी केवळ शुक्राणूजन्य नलिकाद्वारे अंडकोषातून खाजगी भागापर्यंत पोहोचतात. रिसाग दोन शुक्राणू नलिकांमध्ये (व्हॅस डेफेरेन्स) इंजेक्शनने दिले जाते जे शुक्राणूंना अंडकोषातून खाजगी भागांमध्ये घेऊन जातात.

सर्व प्रथम, इंजक्शन ज्या ठिकाणी टोचायचे आहेत तेथे भूल दिली जाते. नंतर रिसॅग अनुक्रमे पहिल्या आणि नंतर दुसऱ्या शुक्राणू वाहिनीमध्ये दिले जाते. एकदा इंजेक्ट केल्यावर, पॉलिमर शुक्राणू वाहिनीच्या भिंतींना चिकटून राहतो. जेव्हा पॉलिमर शुक्राणू नकारात्मक चार्ज केलेल्या शुक्राणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा ते त्यांच्या शेपट्या तोडतात. ज्यामुळे ते फलित होऊ शकत नाहीत.

Male Contraceptive RISUG
Men Health : पुरुषांनी आवर्जून खा चिया सिड्स, वाचा चिया सिड्सचे 4 जबरदस्त फायदे

महिलांसाठी क्रांतिकारक बदल

आत्तापर्यंत पुरुष केवळ गर्भनिरोधकांसाठी कंडोमचा अवलंब करत असत, परंतु शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना गर्भधारणा रोखण्याचा कोणताही मार्ग नव्हता. गर्भधारणा टाळण्यासाठी महिला सध्या घेत असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

यामुळे महिलांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मेल जन्म नियंत्रणाचा परिचय महिलांच्या आरोग्यावर आणि जीवनावर सकारात्मक परिणाम करेल कारण गर्भनिरोधकांची संपूर्ण जबाबदारी महिलांवर अवलंबून राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.