- मानिनी गुर्जर, उद्योजक
पतीला हिवाळ्यात थंडी वाजेल, म्हणून मी सन १९९५ मध्ये एक जॅकेट शिवले होते. ते त्यांना आणि त्यांच्या मित्रांना खूप आवडले. ते ऑफिसमध्ये ते जॅकेट घालून जात, तेव्हा त्यांचे मित्र सांगत, की आम्हालाही असे जॅकेट घेऊन घे. आपले उत्पादन नागरिकांच्या पसंतीस पडत आहे हे लक्षात आल्याने मी त्यांच्या विक्रीसाठी उत्पादन सुरू केले. जॅकेटपासून सुरूवात झालेला प्रवास आता ४५ हून अधिक उत्पादनांपर्यंत येऊन पोचला आहे.