जर तुमच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द असेल, तुमच्या डोळ्यात स्वप्ने असतील आणि ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, चुकांमधून शिकण्याची तयारी असेल आणि पडल्यानंतर पुन्हा उठण्याची तयारी असेल, तर ते आहे. खूप उशीर नाही हे बरोबर आहे, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
चढ-उतारांनी भरलेल्या या प्रवासात तुमचा हात धरायला कोणी सोबत असेल तर प्रवास सोपा होतो. आयपीएस मनोज शर्मा यांचीही अशीच कहानी आहे. 12वी फेल हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट आयपीएस मनोज शर्मा यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित आहे.
IPS मनोज शर्मा यांचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे, पण IRS श्रद्धा जोशी त्यांचे धैर्य आणि प्रोत्साहन म्हणून त्यांच्यासोबत कशी राहिली याचाही उल्लेख आहे. विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर यांनी पडद्यावर या दोघांच्या भूमिका साकारल्या आहेत. (IAS Manoj Kumar Sharma IAS)
आयपीएस मनोज यांचा जन्म मध्य प्रदेशातील बिलगाव या गावी झाला. आयपीएस मनोज शर्मा यांचे गाव आहे, ज्यांना सर्वजण बिलगवान चौधरी या नावाने ओळखतात. हे गाव देखील इतर गावांसारखे सामान्य असायचे, परंतु एका व्यक्तीमुळे आज संपूर्ण देशात हे गाव प्रचलित आहे.
मनोज कुमार शर्मा सुरुवातीपासूनच अभ्यासाची फारशी आवड नसणारे होते. ते 12 वी बोर्डाची परीक्षा नापास झालेत. या परिक्षेत हिंदी वगळता इतर सर्व विषयांत नापास झाले. 12वी नापास झाल्यानंतर त्यांनी भावासोबत ऑटो चालवण्याचे काम सुरू केले. घरची जबाबदारी पार पाडत ते उच्च शिक्षणासाठीही धडपड करत होते.
अभ्यास करताना मनोज यांनी ग्वाल्हेरमध्ये राहण्यासाठी टेम्पोही चालवला. या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते आणि त्यामुळे त्यांना रस्त्यावरील फिरस्ते, भिकारी यांच्यासोबत झोपावे लागत होते.
12वीत नापास झाल्यानंतर खूप मेहनतीनंतर मनोज यांनी दिल्ली गाठली आणि मुखर्जी नगर येथे यूपीएससी कोचिंग सुरू केले. इथेच कोचिंगदरम्यान त्यांची भेट श्रद्धा जोशी यांच्याशी झाली. श्रद्धा ही उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी असून तिही येथे परीक्षेची तयारीही करत होती. आयपीएस होण्याच्या शर्यतीत श्रद्धा सोबत होती, म्हणूनच हे सर्वकाही साध्य झाले असल्याचे मनोज सांगतात.
मनोज यांच्या खडतर प्रवासाबद्दल बोलताना ते नेहमी एका शहराचा उल्लेख करतात. ते म्हणजे कोल्हापूर. ‘आम्ही कोल्हापुरी लयभारी’ हे ब्रिदवाक्य सत्य असल्याचे किस्से मनोज शर्मा नेहमी सांगतात. आजवर अनेक शहरात कर्तव्य बजावले. पण ज्या शहरातून बाहेर पडताना जास्त त्रास झाला असा प्रश्न जेव्हा मनोज शर्मा यांना विचारला जातो तेव्हा ते भावूक होतात अन् कोल्हापुरच नाव घेतात. (Kolhapur)
आयपीएस मनोज कुमार शर्मा यांना एका मुलाखतीत जेव्हा पोस्टिंगबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा आजवर काम केलेल्या ठिकाणांपैकी कोणतं शहर जास्त आवडलं, असाही एक प्रश्न होतो. तेव्हा त्यांनी आवडतं शहर म्हणून कोल्हापुरचा उल्लेख केला.
कोल्हापुर आमच्या चंबळच्या खोऱ्यासारखं आहे. तिथली लोकांची मानसिकता ही चंबळ खोऱ्यातील सामान्य नागरिकांसारखीच आहे. चंबळच्या लोकांना एखादा माणूस आवडला तर आवडला, नाही आवडला तर कितीही प्रयत्न केले तरी तो आवडणार नाहीच.
कोल्हापुरची माणसं एकदम साधी आहेत, इतकी की एखादा व्यक्ती प्रमाणिकपणे काम करतोय असे दिसले तर सगळे लोक त्याच्यापाठीशी असतात. कोल्हापुरातील अनेक आंदोलनांने केवळ लोक पाठीशी होते म्हणून सोडवता आले. तसेच, गणेश विसर्जन मिरवणूकीत तर कोल्हापुरचा बंदोबस्त बघणाऱ्या पोलिसांनाही उचलून घेऊन ते नाचतात.
आजही जेव्हा कधी कोल्हापुरहून कोणाचा फोन येतो तेव्हा सर्वात आधी हाच प्रश्न असतो की जेवला का साहेब! जसं हक्काच्या व्यक्तीसोबत आपण चर्चा करतो तशीच ही कोल्हापुरची माणसं आहेत,असेही मनोज शर्मा म्हणाले.
कोल्हापुरातील ते २२ महिने
मनोज कुमार शर्मा यांनी कोल्हापुरात 2014 मध्ये पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारला होता. पोलीस कर्मचाऱ्यांना घरापासून जवळ बदली, पोलिसांचे आरोग्य, पोलिसांच्या अडचणी यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन पोलिसांची कार्यक्षमता वाढवली होती. सीसीटीएनएस, व्हॉटस्अॅपवर तक्रारी हे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या 22 महिन्याच्या कारकीर्दीत अवैध धंद्यांवर पूर्णपणे चाप बसवला होता. खुलेआम सुरू असणारा मटका, जुगार अड्डे, बेटिंगवर कारवाई केल्याने 22 महिने ‘कोल्हापूर मटका व जुगार मुक्त’ केला.
कुत्र्यांना फिरवण्याचे मिळायचे 400 रूपये
मनोज यांनी हालाखीच्या परिस्थितीतून दिवस काढले आहेत. याची जाणिव होते जेव्हा आपण त्यांच्या जीवनातील अनेक कटू प्रसंग ऐकतो. कोचिंग क्लासेस सुरू होते. तेव्हा अभ्यासांच्या पुस्तकांसाठी, रोजचा खर्च भागवण्यासाठी मनोज यांनी काही पार्ट टाईम काम करावे असे ठरवले.
पण, मुलांची शिकवणी घेणं तसं सोप्प काम नव्हतं. लोकांचा आपल्यावर विश्वास असायला हवा, त्यामुळेच त्यांना हे काम मिळाले नाहीत. मग त्यांनी मोठ्या घरातल्या लोकांची पाळीव कुत्री फिरवण्याचे काम केले.
मोठ्या घरातील लोकांना वेळही नसतो त्यामुळे पाळीव प्राणी फिरवणे शक्य नसते. तेव्हा हे काम करून मनोज प्रत्येक कुत्र्यामागे 400 रूपये कमवायचे, ही गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.