Mansplaining Meaning : फुकटचे सल्ले देणाऱ्या पुरुषांना वठणीवर कसं आणायचं ?

काही पुरुषांना स्त्रियांसमोर आपली हुशारी सिद्ध करायला आवडतं. त्यामुळे महिलेने कोणताही सल्ला मागितलेला नसताना पुरूष त्यांना काहीतरी मार्गदर्शन करायला जातात.
Mansplaining
Mansplainingsakal
Updated on

मुंबई : तुम्ही Mansplainingबद्दल ऐकले आहे का ? होय, नात्याच्या बाबतीत ही संज्ञा खूप वापरली जात आहे. हा शब्द काही वर्षांपूर्वीच अद्ययावत शब्दकोशात जोडला गेला आहे, परंतु त्याची संकल्पना शतकानुशतके सुरू आहे.

काही पुरुषांना स्त्रियांसमोर आपली हुशारी सिद्ध करायला आवडतं. त्यामुळे महिलेने कोणताही सल्ला मागितलेला नसताना पुरूष त्यांना काहीतरी मार्गदर्शन करायला जातात. यालाच मॅन्स्प्लेनिंग म्हणतात. (Mansplaining Meaning what to do with men who gives unnecessary advice to women) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Mansplaining
Men Health : इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर १ महिन्यात करा मात; आहारात करा असा बदल

मॅन्सप्लेनिंग म्हणजे काय ?

२००८ मध्ये एक अतिशय लोकप्रिय चर्चेत आला होता. रेबेका सॉलनिट नावाच्या लेखिकेने ‘मेन एक्स्प्लेन थिंग्ज टू मी’ या शीर्षकाचा हा निबंध प्रसिद्ध केला होता. तिच्या या निबंधावर एक पुस्तकही लिहिले गेले. हळुहळू या निबंधाच्या आधारे manexplain ही संज्ञा mansplaining झाली. या शब्दाचा अर्थ अजूनही बदलत आहे.

महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही प्रकारचे स्पष्टीकरण ऐकावे लागते. जरी ती बॉस म्हणून काम करत असेल तरी पुरूष नेते, कर्मचारी इत्यादी त्यांना एक ना एक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत राहातात.

हे केवळ कामाच्या ठिकाणीच असेल असे नाही. घरात नवरा रिलेशनशिपमध्ये असेल, तर बॉयफ्रेंड, वडील वगैरे सगळे काही ना काही मॅन्सप्लेनिंग करतात.

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या व्याख्येकडे गेलं तर त्याचा अर्थ असा होतो - पुरुषाकडे न मागताही त्याने दिलेला सल्ला. अशा प्रकारे गोष्टी समजावून सांगणे की पुरुष स्वतःला मोठे सिद्ध करू शकतात किंवा स्वतःला ज्ञानी दाखवू शकतात.

साधारणपणे पुरुष असे वागताना असा टोन अवलंबतात, जो ते त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत अवलंबत नाहीत. समोरच्या व्यक्तीने सल्ला मागितला किंवा नाही विचारला तरी, मॅन्सप्लेनरला गोष्टी समजावून सांगण्याची गरज नक्कीच वाटते.

mansplainingची काही लक्षणे

  • न विचारता सल्ला देणे.

  • स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणे.

  • एखादी स्त्री काही करत असेल तर ते चुकीचे असल्याचे दाखवणे.

  • स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ वाटणे.

  • काही नोकर्‍या फक्त पुरुषांसाठी आहेत असे गृहीत धरणे.

Mansplaining
Women v/s Men : पुरुषांच्या या सवयींची महिलांना प्रचंड चीड येते

मॅन्स्प्लेनिंग कसे टाळावे ?

१. प्रत्येक कामात व्यत्यय

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संंबंधित पुरूष मॅन्स्प्लेनिंग करत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आणून द्या. जर तुमच्यासोबत असे वारंवार घडत असेल, तर तिथेच सगळं थांबवा.

अनेक वेळा मॅन्स्प्लेनिंग करणार्‍याला आपण असे करत आहोत हे कळत नाही. तुम्ही त्याकडे दुर्लक्षही करू शकता. पण पुन्हा पुन्हा असेच कृत्य झाल्यास तुम्हाला राग येतो. तुम्हाला राग येत आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून देखील समजावून सांगू शकता.

२. पुरावा मागा

जर एखादा पुरूष सहकारी तुम्हाला न विचारता वारंवार सल्ला देत असेल, तर त्याला त्याच्या पात्रतेचा पुरावा विचारा. हे एक टोकाचे पाऊल असेल, परंतु समोरच्या व्यक्तीला हे स्पष्ट होईल की आपल्याला पुन्हा पुन्हा सल्ला देणे आवडत नाही.

३. तुमच्या समजुतीवर लक्ष केंद्रित करा

एखादे काम स्वत:च्या हिंमतीवरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गरज असेल तिथे योग्य माणसाचाच सल्ला घ्या. न मागता सल्ले देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा.

येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की मॅन्स्प्लेनिंग करणारा माणूस हा वाईटच असावा असे नाही. त्याचा हेतू अगदी स्पष्ट असू शकतो. तुमच्यापेक्षा जास्त जाणकार, तज्ज्ञ किंवा अनुभवी कोणी एखाद्या गोष्टीवर सल्ला देत असेल तर तोही समजून घेण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही परिस्थितीत, पहिल्या झटक्यात प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मॅनस्प्लेनिंग हा एक शब्द आहे ज्याचा खूप नकारात्मक अर्थ आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही प्रत्येक परिस्थिती काही समजून घेऊन हाताळा.

अशा पुरुषांशी थेट वाद घालण्यापेक्षा आधी चांगल्या पद्धतीने समजावून पाहा. पुरुषांची जडणघडण होताना नकळत त्यांच्यात पुरूषी अहंकार समाजाकडून पेरला जातो. त्यामुळे मॅन्स्प्लेनिंग घडते. त्यामुळे ही गोष्ट योग्य पद्धतीने हाताळायला शिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.