Healthy Fruits List: निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा Fruits समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विटामिन्स Vitamins तसचं मिनरल्स आढळतात. Marathi Health Tips Eat Fruits Daily to keep yourself Healthy
फळांमधील अँटीऑक्सिड्टस आणि इतर पोषक तत्वांमुळे अनेक आजारांपासून दूर राहणं शक्य होतं. हेल्दी Healthy राहण्यासाठी दिवसातून किमान एक तरी फळ Fruit खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.
अनेकजण रोजच्या आहारामध्ये Diet फळांचा समावेश करणं गरजेचं समजत नाहीत. फळं म्हणजे केवळ कधी तरी खाण्याचा पदार्थ किंवा आजारी पडल्यानंतर खाण्याचा पदार्थ म्हणून फळांकडे पाहिलं जातं. मात्र हा समज अत्यंत चुकीचा आहे. दररोज फळं खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहणं शक्य आहे.
यासाठी आज आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर असलेल्या १० फळांची माहिती देणार आहेत. यातील काही फळं ही बाजारामध्ये कायम अगदी मुबलक दरामध्ये उपलब्ध असतात.
संत्र- संत्र हे विटामिन सीचं समृद्ध स्त्रोत मानंलं जातं. दररोज १ संत्र खाल्ल्याने तुमच्या शरीराला दिवसभरात लागणारी विटामिन सीची पूर्तता होऊ शकते. तसचं यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतात.
हाडं मजबूत होण्यासाठी, निरोगी त्वचा आणि केसांसाठी तसचं दातांसाठी संत्र्याचं सेवन फायदेशीर ठरतं.
हे देखिल वाचा-
केळं- केळ्यामध्ये पोटॅशिय मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. पोटॅशियमुळे हृदयाचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. तसचं रक्तदाब नियंत्रणात राहतं. केळ्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
त्याच प्रमाणे केळ्यामध्ये आढळणाऱ्या प्रोबायोटिक बॅक्टेरियामुळे हाडं मजबुत होण्यास मदत होते. यातसोबत केळ्याच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामिळे एनिमियाच्या रग्णांना केळ्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.
डाळिंब- डाळिंब हे एक प्रकारचं सुपरफूड आहे. डाळिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनोल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरात आजार किंवा विविध समस्या निर्माण करणाऱ्या ऑक्सिडेटिव तणावाशी लढण्याची ताकद वाढते.
डाळिंबाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना डाळिंबाचं सेवन फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे यातील पोषक गुणधर्मांमुले गुड कोलस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. तसचं चांगलं पचन आणि निरेगी हृदयासाठी डाळिंबाचं सेवन उपयुक्त ठरतं.
सफरचंद- सफरचंदाचे देखील आरोग्यासाठी फायदे आहेत. दररोज एका सफरचंदाचं सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. सफरचंदात फायबर, कॅल्शियम आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते परिणामी हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
सफरचंदाच्या सेवनामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसचं यातील पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
अननस- अननसाचे देखील आरोग्यासाठी फायदे आहेत. अननसामध्ये ब्रोमेलॅन नावाचं कंपाउंड आढळतं ज्यामुळे सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते. अननसातील फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते तसचं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
अननसातील कॅल्शियममुळे स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते. तसचं हाड मजबूत होण्यासाठी अननसाचं सेवन फायदेशीर आहे.
हे देखिल वाचा-
स्ट्रॉबेरी- स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनोल्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यातील विटामिन सी मुळे वजन कमी होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमधील पोषक गुणधर्मामुळे कॅन्सरसह अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीतील विटामिन सीमुळे हाडं आणि दात मजबूत होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमधील गुणधर्मांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
ब्लॅकबेरी- ब्लॅकबेरी विटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पोटॅशियम आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे. मेंदूची ताकद बुस्ट करण्यासाठी तसचं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्लॅकबेरीचं सेवन फायदेशीर ठरतं.
अशा प्रकारे नियमित काही फळांचं सवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवणं शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.