Caution बिअरच्या सेवनामुळे Kidney च्या समस्यांसोबतच वाढतील इतर धोके

beer side effects: बिअरच्या सेवनाचे काही फायदे असले तरी नियमितपणे आणि प्रमाणाबाहेर बिअरचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी Health नुकसानदायक ठरू शकतं
beer side effects
beer side effectsEsakal
Updated on

beer side effects: अनेकजण अल्कोहोलचं Alcohol प्रमाण कमी असल्याने बिअर पिण्यास पसंती देतात. स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा एखादं सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकजण थंडगार बिअर पितात. इतर अल्कोहोल असलेल्या पेयांच्याDrinksतुलनेत बीयर कमी हानिकारक असल्यासं मानलं जातं. Marathi Health Tips Know the Dangers causing due to beer Consumption

काही अभ्यासानुसार बिअरच्या सेवनामुळे हृदयाच्या आजारांचा Heart Diseases धोका कमी होऊ शकतो. तसचं वेदना कमी होतात तसचं वय वाढण्यास मदत होते असंही म्हटलं जातं. अर्थाच बिअरच्या सेवनाचे काही फायदे असले तरी नियमितपणे आणि प्रमाणाबाहेर बिअरचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी Health नुकसानदायक ठरू शकतं.

बिअरच्या अतिसेवनामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होवू शकतात ते पुढे जाणून घेऊयात.

फॅट्सचं प्रमाण वाढतं- बिअरमध्ये अल्कोहलचं प्रमाण अत्यंत कमी असली तरी यामध्ये कॅलरीजचं प्रमाण मात्र जास्त असतं. एक पिंट बिअरमध्ये जवळपास १५० कॅलरी असतात. अनेक लोक एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बिअरचं सेवन करतात त्यामुळे कॅलरीज वाढतात.

अल्कोहलमधील कॅलरीज आणि खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या कॅलरीज यामध्ये बराच फरक आहे. अल्कोहलमधून मिळणाऱ्या कॅलरीज या पोटाच्या मध्य भागात जमा होतात. यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. त्यामुळेच बिअरच्या सेवनामुळे पोट वाढू लागतं आणि ते कमी करणं कठीण असतं.

हे देखिल वाचा-

beer side effects
Nasal Drop Side Effects : चोंदलेलं नाक सुरळीत करण्यासाठी नेजल ड्रॉप वापरताय, यामुळे वाढतो Heart Attack, Stroke चा धोका ?

किडनीसाठी धोकादायक- बिअरचं पुरुषांसाठी प्रतिदिन दोन पेग आणि महिलांसाठी एक हे प्रमाण योग्य मानलं जातं. मात्र याहून अधिक बिअरचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठर शकतं. जास्त अल्कोहलचं प्रमाण असलेल्या बिअरचं जास्त सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते.

बिअर मूत्रवर्धक असल्याने तिच्या अतिसेवनामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो. तसंच यामुळे डिहायड्रेशनही होऊ शकतं. सतत जास्त बिअरचं सेवन केल्याने किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो.

हृदयासाठी हानिकारक- काही अभ्यासांनुसार बिअरचं सेवन हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं म्हंटलं जात असलं तरी प्रमाणापेक्षा जास्त बिअरचं सेवन हे हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त बिअरचं सेवन केल्याने हृदयाच्या स्नायूंना हानी पोहोचते, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, टाइप-2 मधुमेह आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका वाढतो.

शरीरात पोषक तत्वांची कमतरता होवू शकते- नियमितपणे बिअरचं सेवन केल्यास शरीराला विटामिन्स आणि खनिजांची जास्त गरज भासते आणि शरीराला या अतिरिक्त विटामिन्स आणि खनिजांची पूर्तता निर्माण न झाल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अनिद्रेची समस्या- अल्कोहल आणि झोपेचा खूप जवळचा संबध आहे. काहीवेळा अल्कोहलमुळे झोप लागण्यास मदत होऊ शकते मात्र दीर्घकाळापासून बिअरचं सेवन करत असल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे दिवसा एखाद्या कामामध्ये मन एकाग्र करण्यास त्रास होऊ शकतो तसचं तुम्हाला थकवा जाणवू शकतो. जास्त प्रमाणात बिअरच्या सेवनामुळे अनिद्रेची समस्या निर्माण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.